समीर वानखेडेला वर्षभरात तुरुंगात टाकणार - नवाब मलिक

तुझी बोगसगिरी जनतेसमोर आणणार. त्याचा बाप, त्याच्या घरातले सगळे बोगस आहेत.
Sameer Wankhede Navab Malik
Sameer Wankhede Navab MalikANI/SaamTV

मावळ : अंमली पदार्थ Drugs कक्षाचे विभागीय संचालक समीर वानखेडे हे सध्या प्रचंड चर्चेत आहेत आर्यन खानची अटक आणि त्यावरुन त्यांच्यावरती झालेल्या आरोपांमुळे ते प्रचंड चर्चेत आहेत. आज अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी अनेक वेळा वानखेडेंवरती टीका आणि आरोप केले आहेत. वानखेडे आणि त्याच्या परिवाराने मालदीव मध्ये बॉलिवूड Bollywood मधील कलाकारांकडून वसूली केल्याचा आरोप केला असतानाच आता त्यांनी वानखेडंना चक्क आव्हान दिल आहे.

हे देखील पहा -

'समीर वानखेडेला आव्हान देतो की वर्षभरात तुझी नोकरी जाईल. तुझा तुरुंगवास निश्चित आहे. राज्याची ही जनता हे पाहून राहील. तुझी बोगसगिरी जनतेसमोर आणणार. त्याचा बाप, त्याच्या घरातले सगळे बोगस आहेत. माझ्या जावयाला तुरुंगात टाकले आणि आता मला फोन करतो, यात माझं काही नाही. मग कोणत्या बापाच्या सांगण्यावरून हे करतोय?' तुझा बाप कोण याचं उत्तर दे ना. तुझ्या बापाला मी घाबरत नाही. तुला तुरुंगात टाकल्या शिवाय मी गप्प बसणार नाही असा इशारा अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक Navab Malik यांनी वानखेडेंना दिला आहे.

मलिकांच्या जावयांवरती देखील NCB ऩे अटक केली होती आणि त्यामुळेच मलिकांचा रोष एनसीबी वरती असल्याच्या देखील चर्चा आहेत. तसेच माझ्या जावयाकडे गांजा नव्हे तर हर्बल तंबाखु सापडली असल्याचा दिवा देखील मलिकांनी केला आहे.

अनन्या पांडेच्या घरी NCBची धाड

दरम्यान एनसीबीचा चार्च वानखेंडे यांनी घेतल्या पासून बॉलिवूड मधील अनेक कलाकारांची त्यांनी चौकशी केली आहे. अनेकांना जेलची हवा पण खायला लावली आहे. अशातच आता सर्वात जास्त चर्चीली जाणारी कारवाई म्हणजे शाहरुख खानचा मुलगा आर्यंन खान (Shah Rukh Khan's son Aryan Khan)याला झालेली अटक अशातच आज अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey)च्या घरी देखील एनसीबीने आज धाड टाकली आहे. दरम्यान ती एनसीबी ऑफिसला हजर झाली आहे.

भारताने पाकिस्तान मॅच -

अमित शाहांचे Amit Shah चिरंजीव जय शहा Jay Shah क्रिकेट बोर्डवर आहेत. त्यामुळे भारताने पाकिस्तान सोबत खेळायचं की नाही हा निर्णय अमित शहांनी घ्यावा. ते जो निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com