Pune News: रवींद्र धंगेकरांनी सांगितलं गिरीश बापट यांना पोटनिवडणुकीत न भेटण्याचं कारण; भेटीसाठी दुचाकीवरून पोहोचले

Ravindra Dhangekar Meets Girish Bapat: रवींद्र धंगेकरांनी यावेळी गिरीश बापट यांना पोटनिवडणुकीत न भेटण्याचं कारण सांगितलं.
Ravindra dhangekar
Ravindra dhangekar Saam tv

सचिन जाधव

Ravindra Dhangekar News : कसबा पेठ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे हेमंत रासने यांचा पराभव केला. २८ वर्षानंतर कसबा पेठ मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. आज कसबा पेठ मतदारसंघातून पाच वेळा निवडून विधिमंडळात गेलेले भाजप खासदार गिरीश बापट यांची भेट नवनिर्वाचित काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी घेतली. याचदरम्यान, या भेटीनंतर रवींद्र धंगेकरांनी यावेळी गिरीश बापट यांना पोटनिवडणुकीत न भेटण्याचं कारण सांगितलं. (Latest Marathi News)

कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांची भेट घेतली. खासदार गिरीश बापट गेले काही दिवसांपासून आजारी आहेत. भाजपचे गिरीश बापट यांची कसबा पेठ मतदारसंघातून पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. काँग्रेसचे धंगेकर यांनी या पोटनिवडणुकीत जिंकून इतिहास रचला आहे.

Ravindra dhangekar
Kasba Peth Election Result : 'कसब्यातला विजय मविआचा नाही', फडणवीसांच्या विधानानंतर चर्चांना उधाण

काँग्रेस (Congress) आमदार रवींद्र धंगेकर यांनी गिरीश बापट यांच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. रवींद्र धंगेकर म्हणाले, 'दोन वेळा गिरीश बापट यांच्या विरोधात निवडणूक लढवली. तेव्हा निवडणूक खेळीमेळीत झाली होती. बापट हे सर्वसमावेशक राजकारण करत होते. आज भाजप वेगळं राजकारण करत आहे'.

गिरीश बापट यांचा संदेश सांगताना रवींद्र धंगेकर म्हणाले, 'अडचण येईल, तेव्हा मला सांग मी मदत करेल. पुढच्या काळासाठी शुभेच्छा' असा संदेश बापट यांनी धंगेकर यांना दिला. तसेच गिरीश बापट यांच्या भेटीनंतर मन भरून आल्याचे धंगेकर यांनी सांगितलं.

Ravindra dhangekar
Kasba Byelection 2023: 'आम्ही पुन्हा येऊ'; कसबा पोटनिवडणुकीतील पराभवानंतर देवेंद्र फडणवीसांचं ट्वीट चर्चेत

पुढे म्हणाले, 'गिरीश बापट यांनी कधीही कुरघोडीचं राजकारण केलं नाही. निवडणूक काळात ते आजारी होते. मी पोटनिवडणुकीत भेटलो असतो तर भाजपचा त्यांच्यावर संशय आला असता'. त्यामुळे निवडणूक जिंकल्यानंतर गिरीश बापट यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो, असेही धंगेकरांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com