''सेना-भाजपला शिव्या घालणाऱ्यांच्या पंगतीत तुम्ही बसलाय, हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा''

हिंदुत्वाच्या मुद्यावरुन भाजपचा पलटवार
Uddhav Thackeray/Raosaheb Danave
Uddhav Thackeray/Raosaheb DanaveSaam TV

मुंबई - बीकेसी मैदानावर काल शिवसेनेची जाहीर सभा पार पडली. यावेळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांनी विरोधकांना करारा जवाब दिला. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांवर विरोधकांनी जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. भाजपाचे रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

हे देखील पाहा -

रावसाहेब दानवे म्हणाले की, ज्या पक्षाने आतापर्यंत शिवसेना भाजपाला शिव्या घातल्या त्या लोकांच्या पंगतीत तुम्ही जाऊन बसले आहात याचा अर्थ म्हणजे तुम्ही आता हिंदुत्व सोडलं आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या गप्पा मारणं आता तुम्ही बंद करा, असा सल्ला देखील रावसाहेब दानवे यांनी दिला आहे. बाबरी मशीद पडली तेव्हा मी तिथं होता. एकही शिवसैनिक तिथं नव्हता, असं देखील दानवे यावेळी म्हणाले. मुंबईला तोडण्याचा कोणाचा हेतू नाही. मुंबई अभेद्य राहणार आहे. मुंबईवर जेव्हा संकटे येतील तेव्हा पक्षभेद विसरुन आम्ही सर्व एकत्र येऊ,” असे रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केले.

राज्यातील जनतेला या सभेबद्दल मोठी उत्सुकता होती. मुख्यमंत्र्यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. मात्र मुख्यमंत्र्यांचे भाषण ऐकल्यानंतर सर्वांची निराशा झाली आहे. पण मुख्यमंत्र्यांच्या तोंडून आम्ही काय करतो आहोत, आम्ही काय करणार आहोत आणि राज्याची सध्याची स्थिती काय आहे हे न सांगता त्यांनी केवळ भाजपावर तोंडसुख घेण्याचे काम केले आहे, असे रावसाहेब दानवे म्हणाले.

तुम्ही म्हणता आम्ही हिंदुत्व सोडलं नाही, आम्हाला प्रमाणपत्र देण्याची गरज नाही, पण बाळासाहेब ठाकरेंच्या काळात हिंदुत्व सोडलं नसल्यांची सांगण्याची वेळ आली नव्हती. असा टोला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लावला.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com