Breaking: राणा दाम्पत्याला दिलासा नाहीच; पुढील सुनावणी बुधवारी

राणा दांम्पत्याला दोन दिवस तुरुंगातच काढावी लागणार
Ravi Rana- Navneet Rana
Ravi Rana- Navneet RanaSaam TV

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालीसा वाचणार असा पवित्रा घेतलेल्या राणा दाम्पत्य राजद्रोहाच्या गुन्ह्यात जेलमध्ये आहे. मागच्या ९ दिवासापासून राणा दाम्पत्य जेलमध्ये आहे. आज दिलासा मिळेल असे वाटले होते परतु निकालाचे वाचन पुर्ण न झाल्याने राणा दाम्पत्याला दोन दिवस कोर्टातच राहावं लागणार आहे. पुढील सुनावणी बुधवारी म्हणजेच ४ तारखेला होणार आहे. राणा दाम्पत्याचे वकील रिजवान मर्चंट यांनी सांगितले की सुनावणी चार तारखेला सकाळी होईल आणि राणा दाम्पत्याला दिलासा मिळेल असा विश्वासही वकीलांनी व्यक्त केला आहे.

२३ तारखेला राणा दाम्पत्याने मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर शिवसैनिकांनी मातोश्री बाहेर तळ ठोकला. राणा दाम्पत्याला घराबाहेर पडू दिले नाही. त्यानंतर खार पोलिसांनी राणा दाम्पत्याला पोलीस स्टेशन आणि त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्यामुळे गुन्हा दाखल केला. राणा दाम्पत्याने आपल्याला घरचे जेवन मिळाले अशी मागणी केली परंतु न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली होती. राणा दाम्पत्याच्या सुटकेसाठी अमरावतीमध्ये लोक प्रार्थना करत होते.

Ravi Rana- Navneet Rana
बच्चू कडूंचे भर उन्हात श्रमदान, भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने दु:खी

दरम्यान सलग तिसऱ्यांदा राणा दाम्पत्याच्या निकालावर सुनावणी पुढे ढकलली आहे, आता बुधवारी त्यांच्या जामीनावर निर्णय होणार आहे. मात्र अमरावतीमध्ये राणा दामत्याच्या घरासमोर सकाळपासून कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. आज राणा दाम्पत्याची जमानत होणार अशी आशा कार्यकर्त्यांना लागली होती. सकाळपासून सर्व कार्यकर्ते टीव्हीसमोर राणांच्या घरी बसलेले होते. मात्र आजही निकाल आला नसल्याने कार्यकर्त्यांचा मात्र मोठ्या प्रमाणात हिरमोड झाला आहे, तर यावेळी रवी राणा यांचे मोठे बंधू सुनील राणा यांनी प्रथमच माध्यमाना प्रतिक्रिया दिली, मला न्याय देवतेवर विश्वास आहे,संविधानावर विश्वास आहे,4 तारखेला न्यायालयाने आमच्या बाजूजे निकाल देतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com