पुण्यात 4 नंतरही दुकाने सुरु ठेवणाऱ्यांवर कारवाई

पुण्यात 4 नंतरही दुकाने सुरु ठेवणाऱ्यांवर कारवाई मात्र व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम.
पुण्यात 4 नंतरही दुकाने सुरु ठेवणाऱ्यांवर कारवाई
पुण्यात 4 नंतरही दुकाने सुरु ठेवणाऱ्यांवर कारवाई Saam Tv

पुणे : राज्यात २५ जिल्ह्यांत निर्बंध Restrictions शिथिल करण्यात आले आहेत. या वेळी निर्बंध शिथिल करताना दुकानांची वेळमर्यादा वाढवावी. मात्र, पुण्यामधील Pune कोरोनाबाधित Corona रुग्णांची संख्या कमी असताना देखील निर्बंध शिथिल करण्यात आले नाहीत. यामुळे कोरोना निर्बंधाच्या विरोधामध्ये बुधवारी पुण्यात व्यापारी, उपाहारगृह व्यावसायिकांनी आक्रमक झाल्याचे बघायला मिळात आहे.

बुधवारी पुण्यामध्ये प्रशासनाचे administration आदेश धुडकावून व्यापाऱ्यांनी ४ नंतर देखील दुकाने सुरु ठेवली होती. दुकाने सुरू ठेवण्याकरिता संध्याकाळी ७ वाजेपर्यंत परवानगी मिळावी. या मागणीसाठी पुण्यामध्ये व्यापाऱ्यांनी आक्रमकपणा घेतला. तसेच व्यापारी दुकानांना वेळ वाढवून देत नसल्याने व्यापाऱ्यांनी मंगळवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले होते.

हे देखील पहा-

मात्र, पोलीस Police आणि महापालिकेने Municipal Corporation व्यापाऱ्यांवर सरळ कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारपासून पुणे व्यापारी महासंघाने शहरामधील सर्व दुकाने संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा इशारा दिलेला होता. यानुसार बुधवारी दुपारी ४ नंतर शहरामधील लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, बाजीराव रस्ता, बोहरी आळी, टिंबर मार्केट, कर्वे रस्ता, कोथरूड, वारजे आणि सिंहगड रस्ता आदी भागांत दुकाने ४ नंतर देखील उघडी ठेवण्यात आली होती.

मात्र, तुळशीबाग आणि शनिपार चौक भागात दुकाने दुपारी ४ नंतर बंद करण्यात आली होती. पुण्यामधील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. यामुळे दुकाने संध्याकाळी ४ नंतर सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, अशी दुकानदार व हॉटेल व्यावसायिकांची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारपासून सायंकाळी ४ नंतर दुकाने सुरू ठेवण्याचे पुणे व्यापारी महासंघाने जाहीर केले आहे.

पुण्यात 4 नंतरही दुकाने सुरु ठेवणाऱ्यांवर कारवाई
Pune| पुण्यात सरकारी नियम धुडकावत दुकाने चालू; व्यापारी आक्रमक ; पाहा व्हिडिओ

यानुसार बुधवारी शहरामधील मध्यभागात आणि उपनगरांत दुकाने सायंकाळी ४ नंतर सुरू ठेवण्यात आली होती. मात्र, यानंतर सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सुरु केलेल्या दुकानांचे तपशील घेऊन त्यांचे फोटो काढले होते. तसेच दुकानदारांना दुकाने बंद करण्यासही सांगितले होते. दुकानदारांनी आदेशाचे पालन न केल्याने पुणे पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानंही शहर आणि उपनगर मधील फेरीवाल्यांवरती कारवाई करण्यास सुरुवात केली. यामुळे कारवाई सुरु होताच संध्याकाळी ७ च्या सुमारास पुण्यामध्ये सर्वत्र कडक बंद सुरु झाला आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com