Pune : दोन कोटी रुपये खर्च करून बांधलेला महापालिकेचा दवाखाना वापराविना पडून!

हडपसरच्या काळेपडळ भागातील 'रोहन काळे दवाखाना' गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या ताब्यात देण्यात आला होता.
Pune | PMC
Pune | PMC Saam Tv

पुणे : पुण्यातील हडपसर भागातील काळेपडळ परिसरात सुमारे दोन कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला रोहन काळे दवाखाना गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात महापालिकेच्या (PMC) आरोग्य विभागाच्या ताब्यात देण्यात आला होता. मात्र आजही हा दवाखाना (Hospital) सुरू होऊ शकलेला नाही.

हे देखील पहा :

पुणे (Pune) महापालिकेच्या भवन रचना विभागाने ताब्यात आलेल्या ऍमेनिटी स्पेस वर दोन कोटी रुपये खर्च करून १७००० स्क्वेअर फूटाचा दवाखाना हडपसर येथे बांधला आहे. गेली दोन वर्षे पुणे शहरात कोरोना (Corona) महामारीमुळे आरोग्य सेवेवर ताण आला आहे. रुग्णांना खाजगी दवाखान्यात मोठ्या प्रमाणावर खर्च करून उपचार घ्यावे लागले आहेत. 

Pune | PMC
Pune : उरुळी कांचन मध्ये 17 वर्षाच्या मुलीवर बलात्कार!

अशा परिस्थितीत महापालिकेचा स्वत:चा दवाखाना सुरू करणे आवश्यक होते. मात्र, तो आजही सुरु होऊ शकलेला नाही. महापालिकेने नागरीकांच्या करांचे दोन कोटी रुपये खर्च करून ऍमेनिटी स्पेस मध्ये बांधलेला दवाखाना आजही वापराविना पडून आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com