शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक

कल्याणमध्ये आमदार बांगर यांच्या प्रतिमेला काळे फासत जोडे मार आंदोलन केले.
Vanchit Aghadi Protest
Vanchit Aghadi ProtestSaam Tv

कल्याण : हिंगोलीचे शिवसेना (Shivsena) जिल्हा प्रमुख आणि आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यानी आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधात केलेल्या आरोपांचे पडसाद राज्यभरात उमटत असून ठिकठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांकडून आंदोलनं सुरू आहे.

Vanchit Aghadi Protest
आमदार बांगर यांना प्रौढ शिक्षण वर्गात दाखल करा - राजेंद्र पातोडे

आज कल्याणमध्ये वालधुनी अशोक नगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांच्या प्रतिमेला काळे फासत जोडे मार आंदोलन केले. यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी बांगर यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. शिवसेनाप्रमुखांनी बांगर यांचे पद रद्द करावे अशी मागणी केली. तसेच बांगर यांना काळं फासू असा इशाराही वंचितच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com