Presidential Election 2022: शिवसेनेचा हा निर्णय ऐतिहासिक ठरेल; संजय निरुपम यांचा हल्लाबोल

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत NDA च्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
Presidential Election 2022, Uddhav Thackeray Latest News, Shiv Sena News Today, NDA’s Droupadi Murmu
Presidential Election 2022, Uddhav Thackeray Latest News, Shiv Sena News Today, NDA’s Droupadi MurmuSaam Tv

मुंबई: राष्ट्रपती निवडणुकीसाठी शिवसेना (Shivsena) भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी आज शिवसेनेवर पाठिंब्यावरुन टीका केली.

संजय निरुपम यांनी ट्विट करत टीका केली आहे. शिवसेनेचा (Shivsena) हा निर्णय ऐतिहासिक असेल अस यात म्हटले आहे. याअगोदर बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेत वेगळे असायचे पण आता निर्णय घेण्यात बदल झाला आहे. आधी बाळासाहेब ठाकरे जे सांगतिल त्याचे पालन खासदार करायचे, पण आता खासदार जे सांगतिल त्याचे पालन केले जात आहे, असा टोला निरुपम (Sanjay Nirupam) यांनी लगावला आहे. (Presidential Election 2022)

Presidential Election 2022, Uddhav Thackeray Latest News, Shiv Sena News Today, NDA’s Droupadi Murmu
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उद्याचा कार्यक्रम रद्द; राज्यातील पूरस्थितीमुळे निर्णय

शिवसेनेने श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्यास हा पक्षाचा ऐतिहासिक निर्णय ठरेल का? का माहित आहे? कारण पूर्वी बाळासाहेब आदेश द्यायचे, खासदार त्यांचे पालन करायचे. यावेळी खासदारांनी आदेश दिले, पक्षाने पाळले, असे होईल. यामुळे शिवसेनेच्या अंतर्गत लोकशाहीचा अंत होईल, अस ट्विट संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी केले आहे.

Presidential Election 2022, Uddhav Thackeray Latest News, Shiv Sena News Today, NDA’s Droupadi Murmu
Cabinet Expansion : या '३' खात्यांवरुन अडलंय मंत्रिमंडळ विस्ताराचं घोडं; भाजपलाही हवी आहेत 'ही' ३ खाती

शिवसेना राष्ट्रपती निवडणुकीत भाजपला देणार पाठिंबा

शिवसेना (ShivSena) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत NDA च्या उमेदवार द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा विरोध डावलून बहुतांश खासदारांच्या मागणीला प्राधान्य देत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (NDA’s Droupadi Murmu)

या संदर्भात शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाकडून लवकरच अधिकृत माहीती जाहीर केली जाणार आहे. या निर्णयावरून आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

आदिवासी क्षेत्रात काम करणारे अनेक कार्यकर्ते शिवसेनेत कार्यरत आहेत. द्रोपती मुर्मु यांच्याबद्दल आमच्या कालच्या बैठकीत चर्चा झाली आहे. प्रत्येकाचे मत आम्ही समजून घेतले आहे. द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा नाही, अशी प्रतिक्रीया शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी दिली. शिवसेनेची भूमिका एक ते दोन दिवसात स्पष्ट होईल. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याबाबत निर्णय घेतील, असंही राऊत (Sanjay Raut) म्हणाले. (Latest Politics News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com