Pune: जुन्नरमधील नारायणगाव आणि वारुळवाडी ठरतायेत ओमिक्रॉनचे हॉटस्पॉट

त्यामुळे ग्रामीण भाग ओमिक्रॉनचा (Omicron) हॉटस्पॉट ठरत आहे.
Pune: जुन्नरमधील नारायणगाव आणि वारुळवाडी ठरतायेत ओमिक्रॉनचे हॉटस्पॉट
Pune: जुन्नरमधील नारायणगाव आणि वारुळवाडी ठरतायेत ओमिक्रॉनचे हॉटस्पॉटSaam Tv

मुंबई : दुबईत थेट पुण्याच्या ग्रामीण भागात ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याने ओमिक्रॉनच्या रुग्न संख्येत भर पडल्याने जुन्नरमधील नारायणगाव आणि वारुळवाडी हॉटस्पॉट ठरत आहे. त्यामुळे नागरिकांची चिंत्ता वाढली आहे. कोरोना नियमांमध्ये शिथिलता मिळाल्याने नागरिकांचा उत्साह गगणाला भिडला आणि नागरिकांचा परदेश दौरा सुरु झाला. दोन वर्षाचा विरंगुळा घालवण्यासाठी जुन्नर मधुन दुबई दौ-यावर गेलेल्या सात जणांनी थेट दुबईतुन ओमिक्रॉनला सोबतच घेऊन आले. आता त्यांच्याच संपर्कातील नारायणगाव आणि वारुळवाडी परिसरातील 3 आणि चाकण मधील 1 नागरिकाला ओमिक्रॉनचा संसर्ग झाला आहे, जुन्नरमध्ये 10 तर चाकणमध्ये 1 रुग्नांची नोंद झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भाग ओमिक्रॉनचा (Omicron) हॉटस्पॉट ठरत आहे.

Pune: जुन्नरमधील नारायणगाव आणि वारुळवाडी ठरतायेत ओमिक्रॉनचे हॉटस्पॉट
''शरद पवार यांनी गोळ्या घातल्या तरी विलीनीकरण घेवून राहणार''

दोन वर्षाच्या काळात राज्यभरात अनेक ठिकाणं हॉटस्पॉट ठरली आहेत, अशातच कोरोना (Coronavirus) पेक्षा ओमिक्रॉनचा संसर्ग झपाट्याने वाढतो असे आरोग्य विभागाकडुन अनेक वेळा आवाहन करण्यात आले आहे, तरी नागरिकांना अजुनही गांभिर्य नसल्याचे वास्तव सध्या नारायणगाव आणि वारुळवाडी परिसरात पहायला मिळत आहे. पुण्याच्या जुन्नर तालुक्यात 10 रुग्नांची नोंद झाली आहे, या रुग्नांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. ओमिक्रॉनची लक्षण सौम्य असली तरी संसर्ग मात्र झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे नागरिकांनी गर्दी न करणे, मास्क आणि सॅनिटाईझरचा वापर गांभिर्याने करायला पाहिजे असे आवाहन आरोग्य विभागाकडुन करण्यात आले आहे.

कोरोना महामारीच्या संकटकाळात अनेकांना मोठमोठ्या संकटांचा सामना करावा लागलाय अशातच आता नव्याने ओमिक्रॉनचा संसर्ग जुन्नर भागात होऊ लागल्याने नारायणगाव आणि वारुळवाडी हॉटस्पॉट ठरतय. मात्र याचं गांभिर्य नागरिकांना नाही. आता प्रशासनाने कडक निर्बंध लावण्याचीच वाट नागरिक पहात आहे असाही प्रश्न निर्माण होत आहे.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com