नवाब मलिक यांचा ED वर गंभीर आरोप; हॉस्पिटलमध्ये अचानक सलाईन काढली...

'जे जे रुग्णालयात असताना आपणाला योग्य ती वागणूक दिली गेली नाही, पिण्याच्या पाण्याची बॉटल देण्यात देखील हलगर्जीपणा केला.'
Nawab Malik
Nawab MalikSaam TV

मुंबई : राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मुंबई सत्र न्यायालयात धक्कादायक खुलासा केला आहे. जे जे रुग्णालयात भर्ती असताना आपणाला योग्य ती वागणूक दिली गेली नाही, पिण्याच्या पाण्याची बॉटल देखील देण्यात हलगर्जीपणा केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

ईडी अधिकाऱ्यांनी (ED Officer) जबरदस्तीने जेजे रुग्णालयातील (JJ Hospital) डॉक्टरांकडून मलिकांचा डिस्चार्ज करून घेतला असल्याचं मलिकांच्या वकीलांनी सांगितलं. वकील म्हणाले, नवाब मलिक यांना जेलमधून मुंबई सत्र न्यायालायत हजर करण्यात आलं. मात्र एखाद्या आरोपीला का अटक केली. याबाबतचं आरोपपत्र दाखल केल्यावर चार्चशीट कॉपी (Chargesheet copy) दिली जाते. मात्र, ती आम्हाला दिली गेली नाही. त्यामुळे आमच्यावर काय कारवाई झाली हेच माहित नाही. त्यासाठी चार्चशीटची कॉपी आपणाला मिळावी ही मागणी आपण कोर्टासमोर केली असल्याचं वकीलांनी सांगितलं.

Nawab Malik
आपण कुठं ही जाऊ, पण आढळराव पाटलांना खासदार करु; संजय राऊतांचं आश्वासन

दरम्यान, २ मे २०२२ रोजी नवाब मलिक यांना जेजे रुग्णालयात हजर केलं. यावेळी त्यांना विशेष ट्रिटमेंटची गरज असताना ईडीचे काही अधिकारी त्यांना ॲडमिट करु नका असं म्हणत होते. तसंच कोणतीही पुर्वसुचना न देता डॉक्टर येतात आणि सलाईन बंद करतात आणि डायरेक्ट डिस्चार्ज दिला असं सागंतात असा आरोप मलिकांच्या वकीलांना केला.

रुग्णालयात सलाईन सुरू असताना काहीच पूर्वसूचना न देता अचानकपणे मलिकांची सलाईन काढली आणि डिस्चार्ज पेपरवर सह्या करुन घेतल्याचा गंभीर आरोपही वकीलांनी केला आहे. तसंच मलिक यांना ईडी तर्फे अद्यापही आरोप पत्राची प्रत देण्यात आली नसल्याचही कोर्टाच्या निदर्शनात आणलं असून वरील सर्व आरोपांसंदर्भात न्यायालयाने ईडीला योग्य ते निर्देश देण्याची विनंती आज कोर्टासमोर केली असल्याचंही वकीलांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com