'सातवीतील विद्यार्थिनीने तिसऱ्या माळ्यावरून मारली उडी अन्...'; मुंबईतील धक्कादायक घटना

मुंबईतून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. सातवी शिकणाऱ्या विद्यार्थिनीने शाळेच्या तिसऱ्या माळ्यावरून उडी मारली आहे.
mumbai news
mumbai news saam tv

Mumbai News : मुंबईतून (Mumbai) धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. सातवी शिकणाऱ्या विद्यार्थिनीने शाळेच्या (School) तिसऱ्या माळ्यावरून उडी मारली आहे. कांजूरमार्गच्या सेंट फ्रान्सिस झेवियर्समधील घटना घडली आहे. या घटनेत विद्यार्थिनीला गंभीर दुखापत झाली आहे. विद्यार्थिनीला गोदरेज रुग्णालयात दाखल करण्यात आहे.

mumbai news
दांडिया खेळताना तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू; मुलाच्या निधनाने वडिलांचाही हृदयविकाराने मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, कांजूरमार्ग येथील सेंट फ्रान्सिस झेव्हीयर्स शाळेच्या छतावरून एका १३ वर्षीय विध्यार्थीनीने उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.सोमवारी, सकाळी ही घटना घडली. या शाळेत सातवी इयत्तेत शिकणाऱ्या या मुलीचे काही महिन्यांपूर्वी वडील आजाराने मृत्यू पावले होते.यामुळे ही विद्यार्थिनी मानसिक तणावात होती.

आज, सोमवारी सकाळी याच तणावात ती शाळेच्या छतावर गेली. छतावर गेल्यावर तिथून तिने खाली उडी मारली. शाळेतील कर्मचाऱ्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या या विद्यार्थिनीला विक्रोळीच्या गोदरेज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.या प्रकरणी कांजूरमार्ग पोलीस पुढील तपास करीत आहेत.

mumbai news
Girish Mahajan : एकनाथ खडसेंनी केलेल्या 'त्या' विधानावर गिरीश महाजन आजही ठाम; म्हणाले...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांजूरमार्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. त्यात एक १३ वर्षांची सातवी इयत्तेत शिकणारी मुलगी आहे. तिने सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शाळेच्या दुसऱ्या माळ्याच्या छतावरून उडी मारली. त्यात ती जखमी झाली. तिच्या दोन्ही पायांना दुखापत झाली आहे. त्यानंतर तिला गोदरेज रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com