Mumbai : दादर रेल्वे स्थानकावर सिग्नल यंत्रणेत बिघाड; मध्य रेल्वे विस्कळीत

दादर रेल्वे स्थानकावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.
Mumbai Local Updates
Mumbai Local Updates Saam TV

Mumbai Local Train : मुंबईतील (Mumbai) नोकरदार वर्गाला गुरुवारी सकाळीच नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागलं. दादर रेल्वे स्थानकावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. याचा मोठा फटका लोकल सेवेला (Local Train) बसला असून दादरहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्या उशिराने जात असल्याची माहिती आहे. (Mumbai Local Todays News)

Mumbai Local Updates
Petrol Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण; पेट्रोल-डिझेल स्वस्त? जाणून घ्या आजचे दर

दादर रेल्वे स्थानकावर सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सध्या विस्कळीत झाली आहे. त्यामुळे दादरहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्या उशिराने जात असल्याची माहिती आहे. अचानक झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना खोळंबा झाला.

Mumbai Local Updates
वेदांता प्रकल्पावरुन आढळराव पाटलांचा हल्लाबोल; म्हणाले, उद्योगपतींना मारण्याचा कट रचता अन्...

अनेक एक्स्प्रेस गाड्यांनाही या तांत्रिक बिघाडाचा फटका बसला आहे.सध्या रेल्वे प्रशासनाकडून तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. तसंच वेळापत्रक पूर्वपदावर आणण्यासाठीही शर्थीचे प्रयत्न मध्य रेल्वेच्या प्रशासनाकडून सुरु करण्यात आले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com