Wadia Hospital Fire : मुंबईच्या वाडिया रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरला आग; ९ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल

मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईच्या वाडिया रुग्णालयात भीषण आग लागली आहे. सदर आग ही ऑपरेशन थिएटरमध्ये लागली आहे. आग लागल्यानंतर अग्नीशमन दलाचे ९ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
wadia hospital
wadia hospital saam tv

मुंबई : मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे. मुंबईच्या वाडिया रुग्णालयात भीषण आग लागली आहे. सदर आग (Fire) ही ऑपरेशन थिएटरमध्ये लागली आहे. आग लागल्यानंतर अग्नीशमन दलाचे ९ अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्नीशमन दलाच्या जवानाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीच्या घटनेत कुणीही जखमी किंवा जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या आगीच्या घटनेने घटनास्थळी घबराहट पसरली आहे. (Mumbai Wadia Hospital Fire News In Marathi)

wadia hospital
जनता ठरवेल मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कोणाला करायचं, अजित पवारांचा हल्लाबोल

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या वाडिया रुग्णालयातील ऑपरेशन थिएटरमध्ये भीषण आग लागली आहे. वाडिया रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावरील ऑपरेशन थिएटरला आग लागली आहे. वाडिया रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर लागलेली आग ही तळमजल्यापर्यंत पोहोचली आहे. या आगीमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने रुग्णांना सुरक्षित ठिकाणी स्थळी हलवण्यात आले आहे. या घटनेत कुणीही जखमी किंवा जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

wadia hospital
गोळीबार करून व्यापाऱ्याला लुटण्याचा प्रयत्न केला, नागरिकांनी धाव घेतली, त्यानंतर...

दरम्यान, या वाडिया रुग्णालयातील आगीचं वृत्त समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगीचा आढावा घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी सदर आगीच्या घटनेची चौकशी केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आग नियंत्रणात असल्याची माहिती आयुक्तांनी त्यांना दिल्याचे सांगितले. वाडिया रुग्णालयातील आग लागल्याची घटना घडल्यानंतर रुग्णालयातील फायर ऑडिटचा मुद्दा चर्चेत आला आहे. या आगीत इमारतीचे थोडे नुकसान झाले आहे. या आगीच्या घटनेत इतर कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com