जामीन मंजूर होताच मनसे नेत्याची फेसबुक पोस्ट चर्चेत; म्हणाले...

अटकपुर्व जामीन मंजूर होताच मनसे नेते संतोष धुरी यांनी आपल्या फेसबुक वर एक पोस्ट टाकली आहे ती चांगलीच चर्चेत आहे.
Sandeep Deshpande/Santosh Dhuri
Sandeep Deshpande/Santosh DhuriSaam TV

मुंबई : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) गुन्हा दाखल केल्यानंतर मागील काही दिवसांपासून गायब असणारे मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना मुंबई सत्र न्यायालयाने आज अटकपुर्व जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्याबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे मुंबई पोलिसांनी मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरु केली होती. यावेळी राज ठाकरे यांच्या घरासमोर संदीप देशपांडे आणि संतोष धुरी (Sandeep Deshpande and Santosh Dhuri) यांना पोलिसांकडून ताब्यात घेतले जात असताना या दोघांनी वाहनातून पळ काढला होता.

मात्र, या दोघांनी पळ काढताना त्यांच्या गाडीच्या धक्का लागल्यामुळे एक महिला पोलीस जखमी झाल्याचा आरोप मनसे नेत्यांवर करण्यात आला होता. त्यामुळे या दोघांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून (Police) गुन्हा दाखल झाल्यापासून हे दोन्ही नेते भूमिगत होते. तसंच त्यांनी अटकपुर्व जामीनासाठी कोर्टात धाव घेतली होती. आज त्यांच्या या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होती, अखेर त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे.

दरम्यान, हा जामीन मंजूर होताच मनसे नेते संतोष धुरी यांनी आपल्या फेसबुक वर एक पोस्ट टाकली आहे ती चांगलीच चर्चेत आहे. त्य़ांनी आपल्या फेसबुकवर लिहलं आहे.'सत्य परेशान हो सकता है,पराजित नहीं. अटकपूर्व जामीन मंजूर...' त्यांच्या या पोस्टमुळे नेमकं सत्य काय आणि या दोघांवरील गुन्ह्यातून त्यांची निर्दोष मुक्तता होणार का? अशा चर्चा सध्या सुरु आहेत. तसंच केवळ विरोधक म्हणून आपल्यावर असे गुन्हे दाखल केल्याचं याआधीचं मनसेकडून सांगण्यात आलं आहे. तर दुसरीकडे नवी मुंबई मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी देखील एक ट्विट केलं आहे. 'हर जोर जुल्म के टक्कर मे,संघर्ष हमारा नारा हैं, संघर्ष हमारा नारा हैं, भावी इतिहास हमारा हैं, मित्र संदीप देशपांडे, संतोष धुरी यांना अटकपूर्व जामीन मंजूर.. असं ट्विट गजानन काळे (Gajanan Kale) यांनी केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com