Maval : लोणावळा परिसरात थंडीची मोठी लाट, ढगाळ हवामानामुळे दृश्यमानता झाली कमी!

ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने दिवसादेखील काही अंतरावरील निटसे दिसणे कठीण झाले आहे.
Maval : लोणावळा परिसरात थंडीची मोठी लाट, ढगाळ हवामानामुळे दृश्यमानता झाली कमी!
Maval : लोणावळा परिसरात थंडीची मोठी लाट, ढगाळ हवामानामुळे दृश्यमानता झाली कमी!SaamTVNews

मावळ : मागील दोन दिवस कडक ऊन पडल्यानंतर कालपासून लोणावळा शहरा सह मावळात अचानक वातावरणात बदल झाला आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने दिवसादेखील काही अंतरावरील निटसे दिसणे कठीण झाले आहे. आकाशात धूलिकणांमुळे गढूळता निर्माण होऊन दृश्यमानता कमी झाली आहे. लोणावळा (Lonavla) परिसरासह संपूर्ण मावळात (Maval) थंडीची लाट पसरल्याने दिवसा देखील हुडहुडी जाणवत आहे.

हे देखील पहा :

अरबी समुद्रावरून (Arabian Sea) येणार्‍या बाष्पयुक्त वार्‍यांमुळे राज्यात ढगाळ हवामान निर्माण झाले आहे. सध्या पश्चिमी चक्रवाताच्या प्रभावामुळे वाहणार्‍या चक्राकार वार्‍यामुळे राजस्थान व परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तर, उत्तर भारतातील राज्यांमध्ये पाऊस व गारा पडण्याची शक्यता आहे. गुजरात (Gujrat) व दक्षिण राजस्थान भागातून धुळीचे वादळ उठल्याने हवेत धूलिकण वाढले आहेत. हे वादळ अरबी सुमद्रमार्गे महाराष्ट्रात दाखल झाले आहे. हवेत धुळीचे (Dust) कण असल्याने दृश्यमानता कमी झाली आहे.

Maval : लोणावळा परिसरात थंडीची मोठी लाट, ढगाळ हवामानामुळे दृश्यमानता झाली कमी!
शिरूर हादरलं! विधवा महिलेवर आठ जणांकडून सामूहिक बलात्कार

श्वसनाचे आजार असलेल्या नागरिकांनी अशा वातावरणात जाणे धोकादायक आहे असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे. घाटमाथ्यावरील लोणावळा शहरात देखील थंडी वाढणार असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी. वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे पुन्हा साथीचे आजार बळावू शकतात. याकरिता अशा वातावरणात घराबाहेर न पडणेच बरे!

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com