केंद्र सरकारच्या 'कोविड इनोव्हेशन' पुरस्कारांत केडीएमसी अव्वल !

केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत घेण्यात आलेल्या कोवीड इनोव्हेशन अवॉर्डमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेने पहिला क्रमांक पटकावला आहे.
केंद्र सरकारच्या 'कोविड इनोव्हेशन' पुरस्कारांत केडीएमसी अव्वल !
केंद्र सरकारच्या 'कोविड इनोव्हेशन' पुरस्कारांत केडीएमसी अव्वल !प्रदीप भणगे

प्रदीप भणगे

कल्याण -डोंबिवली : केंद्र सरकारच्या Central Government महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी Smart City प्रकल्पांतर्गत घेण्यात आलेल्या कोवीड इनोव्हेशन अवॉर्डमध्ये Covid Innovation कल्याण डोंबिवली महापालिकेने KDMC पहिला क्रमांक पटकावला आहे. कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल कल्याण डोंबिवली महापालिका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांचा मतदारसंघ असणाऱ्या वाराणसीला संयुक्तपणे पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कामकाज खात्याचे राज्यमंत्री हरदीप पुरी Hardeep Puri यांच्या अध्यक्षतेखाली आज स्मार्ट सिटीच्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. KDMC tops the Central Government's 'Covid Innovation' award

देशभरातून 100 महानगरपालिकांनी या पुरस्कारासाठी कोविड काळात केलेल्या कामाचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवले होते. त्यामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आयएमएच्या खासगी डॉक्टरांसह राबवलेल्या फॅमिली डॉक्टर-कोविड फायटरसह खासगी डॉक्टरांच्या 'कोविड आर्मी' Covid Army उपक्रमाची विशेष दखल घेण्यात आली.

हे देखील पहा -

केंद्र सरकारकडून करण्यात आली पुरस्कारांची घोषणा

पहिल्या फेरीत केडीएमसीने पहिल्या 10 मध्ये मजल मारली. त्यानंतर घेण्यात आलेल्या अंतिम फेरीत वाराणसी Varanasi आणि कल्याण डोंबिवली महापालिकेला संयुक्तपणे पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आले. लवकरच नवी दिल्ली New Delhi येथे एका सोहळयात या पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे.

कोविडचे Covid व्यवस्थापन करत असताना आपण काय नाविन्यपूर्ण उपाय योजना Innovative solution plan केल्या त्याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. कोविड काळात या वेबपोर्टलला देश पातळीवर मान्यता मिळाली होती. ज्या पद्धतीने अत्यंत कमी साधनांमध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेने यशस्वीपणे कोवीडशी लढा दिला त्याबद्दल हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

केंद्र सरकारच्या 'कोविड इनोव्हेशन' पुरस्कारांत केडीएमसी अव्वल !
Daily योग: एकपाद उत्तानासन

आयएमए IMA डॉक्टर्स, खासगी Private डॉक्टर्स, महापालिका डॉक्टर्स, आरोग्य Health कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांचा, लोकप्रतिनिधी, सर्व नागरिकांचा हा पुरस्कार Award एक सन्मान आहे. महापालिकेचे आयुक्तांनी Municipal Commissioner सांगितले की, नागरिकांना अत्युत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यासह आरोग्य यंत्रणा बळकट करणार,आणि स्मार्ट सिटीअंतर्गत चांगल्या सुविधा निर्माण करण्याचे आमचे पुढील उद्दीष्ट आहे.

Edited by-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com