Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी

आज न्यायमूर्ती एन जी जमादार यांच्या खंडपीठांसमोर ही सुनावणी पार पाडणार आहे.
Anil Deshmukh
Anil Deshmukh Saam Tv

मुंबई - मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जामीन अर्जावर आठ महिने उलटूनही सुनावणी न झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. या आठवड्यात यावर सुनावणी घेऊन निर्णय देण्याचे निर्देश न्यायालयाने उच्च न्यायालयाला दिले होते. त्यानुसार आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. (Anil Deshmukh Latest News)

Anil Deshmukh
कपिल सिब्बल यांच्या 'त्या' प्रश्नांवरून शिंदे गट बॅकफुटवर? कोर्टात नेमकं काय घडलं? वाचा...

अनिल देशमुख यांना 100 कोटी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडी कडून अटक करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात अनेक दिवसांपासून देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी प्रलंबित होती. आज न्यायमूर्ती एन जी जमादार यांच्या खंडपीठांसमोर ही सुनावणी पार पाडणार आहे. अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आठ महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आज याबाबत नाराजी व्यक्त केली.

अनिल देशमुख यांच्या जामीन याचिकेवर तातडीने निर्णय घ्या, असे सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 2 नोव्हेंबर रोजी अनिल देखमूख यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर अनिल देशमुखचा जामीन अर्ज तब्बल आठ महिन्यांपासून उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. आठ महिने जामीन अर्ज प्रलंबित ठेवणे हे जामिनाच्या न्यायशास्त्रानुसार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यानुसार आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यामुळं आज अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर काय निकाल लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com