तरुणाला विवाहितेचा शेवटचा प्रेमाचा कॉल आला अन् पाच जणांनी मिळून त्याचा खून केला

लग्नानंतरच्या फोन कॉलने कारागृह पोलीस अधीक्षकांच्या मुलाचा जीव घेतला आहे. कारागृह अधीक्षकाच्या मुलाच खून करण्यासाठी एका विवाहित महिलेला शेवटचा प्रेमाचा फोन कॉल करण्यास भाग पाडल्याचं समोर आलं आहे.
pune crime news unknown man dead body found in taljai forest pune
pune crime news unknown man dead body found in taljai forest puneSaam Tv

पुणे : हडपसरमध्ये 'पती, पत्नी और वो' या सिनेमा सारख्या कथानकातून साक्षी पांचाळ नावाच्या तरुणीने, पती आणि भावाच्या मदतीने अमरावतीला (Amravati) कारागृह पोलीस अधीक्षक असलेल्या उतरेश्र्वर गायकवाड यांचा मुलगा, गिरीधर गायकवाड याचा हडपसरच्या ग्लायडिंग सेंटरमध्ये चाकूने वार करत खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या खून प्रकरणांत हडपसर (Hadapsar) पोलिसांनी साक्षी पांचाळसह तिचा पती आणि भावासह इतर तीन जणांना अटक केली आहे. गिरीधर गायकवाड वय २१ असे मयत तरुणाच नाव असून. या मयत तरुणाच्या मोबाईलवर परवा रात्री ९ वाजण्याच्या सुमारास साक्षी पांचाळ नावाच्या तरुणीचा फोन आला. तिला भेटून येतो अस सांगून घरातून गेला तो परतलाच नाही.

हे देखील पाहा -

मयत गिरीधर गायकवाड आणि साक्षी पांचाळ हे एकाच कॉलेजमधे शिकतात आणि एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. साक्षी पांचाळचा प्रेमविवाह (Love marriage) झाला असुन, ती गेल्या काही महिन्यांपासून माहेरी रहात होती. तीचा नवरा परवा रात्री तिला भेटायला आला असता, त्याला साक्षी पांचाळच्या मोबाईलमधे (Mobile) गिरीधर गायकवाडचे फोन रेकॉर्ड सापडले.

त्यानंतर साक्षी पांचाळच्या नवऱ्याने तीला गिरीधर गायकवाडला फोन करुन बोलावून घ्यायला सांगितले. साक्षी पांचाळने गिरीधर गायकवाडला हडपसरच्या ग्लायडिंग सेंटरच्या मोकळ्या जागेत बोलावून घेतले. यावेळेस साक्षी पांचाळ तिचा नवरा, नवर्‍याचे दोन मित्र आणि साक्षीचा भाऊ असे पाचजण हजर होते. त्यावेळी गिरीधर गायकवाडवर चाकूने वार करण्यात आले. यामध्ये त्याचा जागेवरच मृत्यू झाला. गिरिधर याचा खून करण्यासाठीच पती आणि भावाने साक्षीला गिरिधरला फोन करून गोड बोलून बोलवून घ्यायला सांगितलं आणि त्याचा खून केल्याचं समोर आलं आहे.

Edited By - Jagdish Pawar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com