बारामती: अपघात झालेल्या कंटेनरमध्ये सापडला 22 लाखांचा गुटखा !

एकूण ४७ लाख २७ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त
Baramati Crime News
Baramati Crime Newsमंगेश कचरे

मंगेश कचरे

बारामती : इंदापूर शहरानजीक अपघात ग्रस्त कंटेनरमध्ये इंदापूर पोलीसांना सुमारे २२ लाख 2२७ हजार ५०० किमतीचा विक्रीस व वाहतुकीस बंदी असलेला आणि मानवी आरोग्यास अपायकारक असणारा गुटखा मिळून आला आहे. इंदापूर (Indapur) पोलिसांनी हा गुटखा व २५ लाख रू किंमतीचे एक सहा चाकी वाहन असा एकूण ४७ लाख २७ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Baramati Crime News In Marathi)

यासंदर्भात इंदापूर पोलिस ठाण्यात पोलीस शिपाई सुहास सिंकदर आरणे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी हनीफ सय्यद रा. बेंगलोर व कंटेनर नंबर के. ए .०१ ए .एफ. ३३९६ चा मालकाविरिध्द इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Baramati Crime News
मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! 16 कोटींचे ड्रग्ज जप्त, 3 तस्करांना अटक

याबाबत सविस्तर वृत्त असे की, रविवारी ९ जानेवारीला पहाटे हाॅटेल देशपांडे व्हेज च्या समोर कर्नाटक (Karnataka) पासिंगचा कंटेरनने ऊसाच्या ट्रॅक्टर ला पाठीमागून धडक बसून अपघात झाला होता. याची इंदापूर पोलिसांना मिळताच इंदापूर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली होती. जखमी वाहन चालकाला उपचार कामी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हे देखील पहा-

अपघातामध्ये कंटेनरचा पुढील भाग चक्काचूर झाल्याने क्रेनच्या मदतीने तो इंदापूर पोलीस ठाण्यात आणन्यात आला. त्यानंतर त्या कंटेनर मध्ये कोणता माल आहे, काही संशयास्पद तर नाही ना? हे पाहिले असता, विक्रीस व वाहतूकीस बंदी असलेला सुमारे २२ लाख रुपये किमतीची ४५ प्लॅस्टीकचे पोते महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला व मानवी आरोग्यास अपायकारक असलेला आर. के. प्रिमीयम कंपनीचा गुटखा मिळून आला.

याचसोबत 25 लाख रू. किंमतीचे एक सहा चाकी वाहन असा एकूण ४७ लाख २७ हजार ५०० रूपये पोलिसांनी जप्त केला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली. सदर गुन्ह्याचा तपास तपास सहा पो. निरीक्षक महेश माने करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com