Grampanchayat Karmchari Andolan : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, राज्यातील ग्रामीण भागातील कामकाज ठप्प

Palghar Latest Marathi News : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. पाेलिसांचा आंदाेलनस्थळी तगडा बंदाेबस्त आहे.
grampanchayat karmchari andolan at zilla parishad palghar
grampanchayat karmchari andolan at zilla parishad palgharsaam tv

Palghar News :

भारतीय कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली पालघर मधील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी पालघर जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर आजपासून (मंगळवार) काम बंद करत धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदाेलनाच्या पार्श्वभूमीवर पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त तैनात करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या आंदाेलनामुळे ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींचा कारभार खोळंबणार आहे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचीही येत्या काळात मोठी गैरसोय झालेली पाहायला मिळेल. राज्यातील 30 हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायत कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यामुळे बहुतांश ठिकाणचे कामकाज ठप्प झाले आहे. (Maharashtra News)

grampanchayat karmchari andolan at zilla parishad palghar
Dhule : 'त्या' आंदोलनाचा धुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून नाेंदविला निषेध

आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन सुरू केलं आहे. सरकार आणि जिल्हा प्रशासनाने यावर तोडगा न काढल्यास हे आंदोलन बेमुदत सुरूच राहणार असल्याचा इशारा भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष विलास कुमरवार यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

grampanchayat karmchari andolan at zilla parishad palghar
Kolhapur : बंद करा...बंद करा...कत्तलखाना कायमस्वरुपी बंद करा..., इचलकरंजी शहरात हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com