मूर्तिकारांना मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्याची घाई

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे.
मूर्तिकारांना मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्याची घाई
मूर्तिकारांना मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्याची घाईदिलीप कांबळे

मावळ - गणेशोत्सव Ganesh अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. राज्य शासनाकडून गणेशोत्सवासाठी नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे. गणेशोत्सव असला तरी कोरोनाचे संकट मात्र आद्यपही तसेच आहे. त्यामुळे यंदाही शासनाच्या नियमावलीत चार फुटापेक्षा मोठी गणेश मूर्ती Ganesh Idol बसविण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. दरम्यान आता गणेश मुर्ती कामगारांनी मूर्तींवर शेवटचा हात फिरवणे सुरू केले आहे.

मावळातील Maval देहूरोड मधील शारदा गणेश मूर्ती कारखान्यातील गणेश मूर्ती संपूर्ण पुणे जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत. पुण्यात Pune गणेशोत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी गणेश मूर्तिकारांनी पुण्यातील मानाचे गणपती बनविण्यावर मोठा भर दिला आहे.

हे देखील पहा -

कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, तुळशीबाग, केशरिबाग, बाबू गेनू, गुरुजी तालीम या मानाच्या गणपतीना मोठ्या प्रमाणात यावर्षी मागणी आहे. परंतु यावर्षी शासनाने घातलेल्या निर्बंधांमुळे चार फुटांपेक्षा मोठ्या मूर्तीना मागणी नसल्याने मूर्तिकारांचा मोठा तोटा झाला आहे. मात्र यावर्षी फेटे बांधलेल्या मूर्तींची मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

सकाळी साडेनऊ वाजता पासून आम्ही मूर्ती बनवायला सुरुवात करतो रात्र कधी होते हे कळतच नाही. जानेवारीपासून मूर्ती बनवायला सुरुवात करतो जुलै-ऑगस्ट मध्ये या मूर्तींना पेंटिंग करण्यास सुरुवात करतो गणपती मूर्ती बनवणे हे मला लहानपणापासून आवडते आपल्या हातून देव घडतात याचा फार आनंद आहे. हे काम करताना वेगवेगळ्या कलर्सची जाण होते. यावर्षी पंधराशे ते सोळाशे मुर्त्या आम्ही घडविले आहे असे मूर्तीकाराने सांगितले आहे.

मूर्तिकारांना मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्याची घाई
उपमुख्यमंत्री आम्हाला साथ देत नाहीत; यशोमती ठाकुरांचा आरोप

गणेश उत्सव काही दिवसावर येऊन ठेवलेला आहे त्यामुळे मूर्तिकार आपल्या मूर्तीवर शेवटचा हात फिरताना दिसत आहे यामध्ये पुण्याच्या मानाच्या गणपती सोबतच मुंबईतील लालबागचा गणपती यांनी तयार केला आहे. गणपती मूर्तीतील डोळे आकर्षक रंग यामुळे ग्राहक यांच्याकडे आपसूक वळत आहे. मात्र येणाऱ्या गणेशोत्सवात सर्वच मंडळी आपल्या गणपती जवळ गर्दी खेचण्याचा प्रयत्न करणार आणि यातच कोरोना वाढण्याची शक्यता आहे. मात्र सगळे सण हे साजरे केले पाहिजे पाहिजे. जर का या सणात कारोनाने डोके वर काढले तर राज्य सरकारसह नागरिकांनाही मोठी किंमत मोजावी लागेल हे नक्कीच.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com