मच्छीमार संघटना आणि पालिकेतील वाद चिघळणार; मच्छीमारांचा 'तो' अहवाल पालिकेला अमान्य?

मुंबई कोस्टल रोडचं बांधकाम गतीने सुरू आहे . पण हा प्रकल्प समुद्रातील पुलाच्या पिलरच्या लांबीमुळे वादात सापडलाय.
BMC
BMC Saam TV

मुंबई : मुंबई कोस्टल रोडचं (Mumbai Coastal Road) बांधकाम गतीने सुरू आहे . पण हा प्रकल्प समुद्रातील पुलाच्या पिलरच्या लांबीमुळे वादात सापडलाय. प्रकल्पानुसार समुद्रात पूल बांधताना त्याचे समुद्रातील एकपासून दुसऱ्या पिलरची लांबी ५० मीटर ठेवण्यात येणार होते, पण यामुळे पाण्यातील जैवविविधतेला धोका निर्माण होऊ शकतो, तसेच मच्छिमारांना भरती वा इतर वेळेस या पुलाखालून ये-जा करण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे या दोन पिलरमधील लांबी २०० मीटर ठेवण्याची मागणी मच्छीमारांनी केली होती. या मागणीसाठी मच्छीमारांनी आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. काही ठिकाणी मच्छीमार (Fisherman) आणि बांधकाम अधिकाऱ्यांमध्ये वाद देखील वाढू लागले होते.

दरम्यान, यावर तोडगा कढण्यासाठी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या उपस्थितीत पालिका (BMC) अधिकारी आणि मच्छीमार संघटनांमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीत मच्छीमार संघटनांनी एक समिती नेमून पिलर मधील अंतराबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले होतं. त्यानुसार मच्छीमार संघटनांनी डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई या तज्ज्ञांची अहवाल बनवण्यासाठी नियुक्ती केली होती.

पहा व्हिडीओ -

ठाकूरदेसाई यांनी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने किनारी रस्ता प्रकल्पासाठी जुलै २०१७ मध्ये तयार केलेल्या समुद्र लाटा (Sea waves) कमाल पाण्याची पातळी, वादळी लाटा, त्सुनामीच्या लाटांची उंची आणि समुद्रतळाशी होणाऱ्या बदलांबाबतच्या अभ्यास अहवालाची माहिती आणि संदर्भ आपल्या अहवालासाठी घेतला आहे. त्यांनी आपल्या अहवालात नमूद केले नुसार १६० मीटर पर्यँत दोन पिलर मधील अंतर राहू शकतं असं म्हटलंय.

मात्र, मच्छीमार संघटनेने नेमलेली संस्था ही या क्षेत्रातील नामांकित संस्था नाही आहे. त्यामुळे या प्रश्नी एनआयओचा अभिप्राय पालिका घेणार असल्याचे सांगत मच्छिमार संघटनेचा अहवाल पालिकेने अमान्य केलाय. त्यामुळे मच्छीमार व पालिकांमधील वाद अजूनच पेटण्याची चिन्ह आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com