किती हा भाबडेपणा? देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार

जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती!'
किती हा भाबडेपणा? देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार
किती हा भाबडेपणा? देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवारSaam Tv

सुशांत सावंत

मुंबई : विजयादशमीनिमित्त काल (ता. १५) शिवसेनेच्या दसरा मेळावा निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी अनेक विषयांबाबत खोचून टीका आणि अनेक आरोपांवर प्रत्युत्तर दिल्याने राज्यात राजकीय आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. तर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar हे पुण्यातील पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर होते. शरद पवार यांनी आज केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यातच त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या निवडीचा घटनाक्रम सांगितला आहे. यावर लगेच देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी ट्वीट करून 'तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले, असे सांगणे म्हणजे किती हा भाबडेपणा?' असा शरद पवारांना टोला लगावला आहे.

'द्वापारयुगात सुईच्या टोकाएवढी जमीन द्यायला नकार दिल्यामुळे महाभारत घडले आणि कलियुगात मात्र तयार नसलेल्यांना हात धरून राज्यकारभाराला लावले, असे सांगणे म्हणजे किती हा भाबडेपणा? साहेब ! जो बूँद से गयी वो हौद से नहीं आती!' असं म्हणत फडणवीसांनी टोला लगावला आहे.

दरम्यान दसरा मेळावामध्ये, 'तुम्ही ही मुख्यमंत्री असता पण वचन मोडलं तुम्ही, त्यांनी वचन मोडलं आणि त्यामुळे पूत्र कर्तव्य म्हणून मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्विकारावी लागली', असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळेस त्यांनी मुख्यमंत्रिपदाच्या निवडीचा घटनाक्रमच सांगून फडणवीस यांना फटकारले होते. तर देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून थेट महाभारताचा उदाहरण देत पवारांना उत्तर दिले आहे.

किती हा भाबडेपणा? देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांवर पलटवार
Weather: पुढील 2 दिवस मेघगर्जनेसह पाऊस; 'या' जिल्ह्यांना IMD अलर्ट

आज काय म्हणाले होते शरद पवार?

शरद पवार आज पिंपरी चिंचवड दौऱ्यावर होते. त्यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले, ते म्हणाले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होण्यासाठी उतावीळ नव्हते. पण हे सरकार होण्यात आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्यात अनेक लोकांचा हात होता त्यातच माझा किंचीत हात होता, अशी कबुली पवारांनी दिली आहे. मुख्यमंत्री कोण होणार म्हणून मी चार वेळा आमदारांची बैठक घेतली. शेवटी कुणीही तयार होत नव्हतं. शेवटी शिवसेनेचे आमदार जास्त असल्याने मुख्यमंत्री शिवसेनेचा करायचं ठरलं, मात्र उमेदवाराचं नाव ठरत नव्हतं, शेवटी मीच उद्धव ठाकरे यांचा हात हातात धरून वर केला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे असतील म्हणून मी घोषित केलं.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com