Pune : ऑटोरिक्षांचे सध्याचे भाडेदर कायम!

पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या हद्दीत तीन आसनी ऑटोरिक्षांच्या भाडेदरामध्ये वाढ करण्याचा घेण्यात आलेला निर्णय पुढील बैठकीपर्यंत प्रलंबित ठेवण्यात आलेला असून ऑटोरिक्शांसाठी सध्याचे दर कायम राहतील.
ऑटोरिक्षांचे सध्याचे भाडेदर कायम!
ऑटोरिक्षांचे सध्याचे भाडेदर कायम!saam tv

पुणे : पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या हद्दीत तीन आसनी ऑटोरिक्षांच्या भाडेदरामध्ये वाढ करण्याचा घेण्यात आलेला निर्णय पुढील बैठकीपर्यंत प्रलंबित ठेवण्यात आलेला असून ऑटोरिक्शांसाठी सध्याचे दर कायम राहतील.

हे देखील पहा :

पुणे प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या संयुक्त बैठकीत येत्या 8 नोव्हेंबरपासून पहिल्या दीड कि.मी.साठी 20 रुपये तर त्यापुढील प्रत्येक कि.मी.साठी 13 रुपये भाडेदर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खटुआ समितीच्या शिफारशींनुसार प्राधिकरणाने हा निर्णय घेतला होता.

ऑटोरिक्षांचे सध्याचे भाडेदर कायम!
विनाशकाले विपरीत बुद्धी! पैशांच्या वाटपावरून दरोडेखोरांचा वाद; एक झाला फितूर
ऑटोरिक्षांचे सध्याचे भाडेदर कायम!
नगरमध्ये विवाहितेवर दोनदा सामूहिक बलात्कार!
ऑटोरिक्षांचे सध्याचे भाडेदर कायम!
२० वर्षीय युवतीवर वारंवार बलात्कार! लोणी पोलिसात गुन्हा दाखल

तथापि देण्यात आलेल्या भाडेवाढीचा पुर्नविचार करण्याबाबत रिक्शा संघटनांनी निवेदने सादर केली असल्याने भाडे दरवाढीची बाब प्राधिरणाच्या पुढील बैठकीपर्यंत प्रलंबित ठेवण्यात आला आहे. तोपर्यंत सध्या असलेले पहिल्या दीड कि.मी.साठी 18 रुपये तर पुढील प्रत्येक कि.मी.साठी 12.19 रुपये असे दर कायम राहतील असे प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी कळवले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com