Mumbai : मासेमारी करणं पडलं महागात; मगरीच्या हल्ल्यात घडली दुर्देवी घटना

Crocodile attacks man fishing at Powai Lake :४० वर्षीय विजय काकवे हे शनिवारी पवई तलावात मासेमारी करत असताना मगरीने त्यांच्या पायाला चावा घेतल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली.
Crocodile attacks man fishing at Powai Lake
Crocodile attacks man fishing at Powai LakeSaam Tv

मुंबई : मुंबईतील पवई (Powai) तलावावर मासेमारी करण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला मासेमारी करणं महागात पडलं आहे. मासेमारी करत असताना अचानक मगरीने त्या व्यक्तीचा पाय धरला. या हल्ल्यात (Crocodile Attack) त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे मासेमारी करणं त्याला महागात पडलं आहे. पवई तलाव हे मुंबईची तहान भागवणारे एक महत्वाचे तलाव आहे. या तलावात मासेमारीही केली जाते. याच तलावात अनेक मगरीही आढळतात, त्यामुळे मासेमारी करताना काळजी घ्यावी लागते. मात्र एका व्यक्तीला मासेमारी करणं अंगाशी आलं आहे. (Crocodile attacks man fishing at Powai Lake)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, मगरीने हल्ला केलेल्या ४० वर्षीय विजय काकवे यांचा मृत्यू थोडक्यात टळला. काकवे हे शनिवारी पवई तलावात मासेमारी करत असताना मगरीने त्यांच्या पायाला चावा घेतल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पवई तलावाच्या काठावर बांधलेल्या रॅम्पमुळे मगरीचा हा हल्ला टाळता आला असता, असे पर्यावरणवादी आणि कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

सेव्ह पवई लेक कार्यकर्ते या आंदोलनाचे पर्यावरण कार्यकर्ते तबरेज सय्यद म्हणाले की, "वर्षाच्या या काळात, मगरी पवई तलावाशेजारी असलेल्या मऊ मातीवर आपली अंडी घालतात. तलावाच्या पलीकडे रेनेसान्स हॉटेलच्या जवळ, आधीच बरीच बांधकामे झाली आहेत. तसेच, अनेक पिकनिकर्स तलावाजळ पार्ट्या करतात ज्यामुळे सागरी प्रजातींना त्रास होतो. तबरेज सय्यद यांनी म्हटलं की, मी वैयक्तिकरित्या काकवे यांना राजावाडी रुग्णालयात नेले आणि डॉक्टरांना त्यांच्या जखमी पायाकडे लक्ष देण्याची विनंती केली, ज्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता,"

Crocodile attacks man fishing at Powai Lake
मराठा क्रांती ठोक मोर्चाचा परळीत आमदार सावंतांच्या समर्थनात रॅली

तरबेज सय्यद यांनी माहिती दिली की, मगरींच्या उपस्थितीचा परिणाम म्हणून, कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा विनंती केली आहे की बीएमसी आणि वन अधिकाऱ्यांनी तलावाभोवती अतिरिक्त चेतावणीचे फलक लावावेत जेणेकरून लोकांनी पाण्याजवळ जाऊ नये. "नागरिक आणि कार्यकर्ते अशा कोणत्याही प्रकल्पाच्या विरोधात असल्याने सायकल ट्रॅकसाठी आतापर्यंत केलेले बांधकाम काढून टाकण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने महापालिकेला नुकतेच दिले होते. मात्र, अद्याप अशी कोणतीही कारवाई झालेली नाही. बीएमसी तलाव संरक्षित करण्यासाठी मदत करेल असा विश्वास सय्यद यांनी व्यक्त केला.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com