Chhagan Bhujbal Audio Clip : १०० एकरातली शेती साफ, कोट्यवधी रुपयांचा खर्च, एवढा पैसा येतो कुठून? छगन भुजबळांचा मनोज जरांगेच्या सभेवर प्रश्न

Political News : १४ ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची सभा अंतरवाली सराटी येथे पार पडणार आहे.
Chagan Bhujba vs Manoj Jarange Patil
Chagan Bhujba vs Manoj Jarange Patil Saam TV

रुपाली बडवे

Mumbai News :

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या १२ दिवसांच्या राज्यव्यापी दौऱ्याचा आज समारोप झाला आहे. आता १४ ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे पाटील यांची सभा अंतरवाली सराटी येथे पार पडणार आहे.

या सभेसाठी जोरदार तयारी देखील सुरु आहे. दरम्यान या सभेवरुन राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. या सभेसाठी एवढा पैसा कुठून आला असा प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. छगन भुजबळ यांची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. मात्र या ऑडिओ क्लिपची साम टीव्ही पुष्टी करत नाही. (Latest Marathi News)

Chagan Bhujba vs Manoj Jarange Patil
Sharad Pawar News: 'पोरांना काय शिकवायचं, गौतमीचा धडा द्यायचा का?' भरसभेत शरद पवार संतापले

समता परिषदेच्या बैठकीत बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं की, मनोज जरांगे यांच्या सभेसाठी १०० एकरातली शेती साफ करुन मैदान तयार करत आहेत. या सभेसाठी 7 कोटी रुपये जमा देखील केले आहेत. एवढे पैसे येतात कुठून? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. (Political News)

या सभेतून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मागणार आहेत, हे आम्हाला कदापी मान्य नाही. आमचा मराठा समाजाला आरक्षण द्यायला विरोध नाही मात्र ओबीसीतून आरक्षण द्यायला विरोध आहे, असं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

Chagan Bhujba vs Manoj Jarange Patil
Maharashtra Politics: 'पुढचे २० वर्ष एकनाथ शिंदेच राज्याचे मुख्यमंत्री...' शिंदे गटाच्या आमदाराचं मोठं भाकित

आपणही मोठे कार्यक्रम करायला हवेत, आपण 54 टक्के आहोत म्हणजेच 7 कोटी आपण आहोत. ओबीसी समाजाला आरक्षण मिळाले म्हणजे ओबीसी श्रीमंत झाला असं नाही. अजूनही झोपडपट्टीत ओबीसी समाज राहत आहे, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं.

मुदत 14 ऑक्टोबरला संपणार

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणावर बसले होते. मात्र सरकारच्या मध्यस्थीनंतर मनोज जरांगे यांनी आपलं आमरण उपोषण स्थगित केलं. त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारला ४० दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत 14 ऑक्टोबरला संपत आहे. त्यामुळे सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भुमिकेकडे सर्वांचं लक्ष आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com