'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची दिलगिरी

राज्य महिला आयोगाने चंद्रकांत पाटील यांच्याकडून खुलासा मागविला होता.
Chandrakant Patil
Chandrakant PatilSaam Tv

मुंबई: भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर टीका करताना एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता पाटील यांच्या विरोधात राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. याबाबत राज्य महिला आयोगाने चंद्रकांत पाटील यांच्याकडून खुलासा मागविला होता. पाटील यांनी राज्य महिला आयागोला पत्र लिहीत दिलगिरी व्यक्त केली आहे.

सुप्रिया सुळे यांच्या संदर्भातील वक्तव्य केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांना पत्र लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ओबीसी बंधू भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या वक्तव्यात सुप्रिया सुळे यांचा अपमान झाला असल्यास दिलगिरी व्यक्त करतो, असं या पत्रात चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

Chandrakant Patil
महिला आयोगाने चंद्रकांत पाटलांकडून 'त्या' वक्तव्याबाबत मागविला खुलासा
Chandrakant Patil Letter
Chandrakant Patil LetterSaam Tv
Chandrakant Patil
ओळखपत्रासाठी आधार कार्ड वापरत असाल तर सावधान! केंद्राचा नागरिकांना इशारा

खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. याबाबत काल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्याकडे लिगल सेलकडून ही तक्रार दाखल करण्यात आली होती. चंद्रकांत पाटील यांनी ओबीसी आरक्षण आंदोलनावेळी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. याबाबत आता महाराष्ट्र राज्य महिला आयोगास तक्रार अर्ज प्राप्त झाले होते.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

ओबीसी आरक्षणावरुन सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली होती. या टीकेली उत्तर देताना पाटील यांनी हे वक्तव्य केलं होतं. सुप्रिया सुळे यांच्या प्रतिक्रियेला प्रत्युत्तर देताना पाटील म्हणाले, 'तुम्ही राजकारणात कशासाठी राहता, घरी जा, स्वयंपाक करा. ओबीसी आरक्षण मिळवून देण्यासाठी दिल्लीत जा,अन्यथा मसणात जा पण आरक्षण द्या; तुम्ही खासदार असून तुम्हाला एका मुख्यमंत्र्याची भेट कशी घ्यायची हे कळत नाही?' अशा कडक शब्दात चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळेंवर बोचरी टीका केली होती. त्यांच्या या टीकेमुळे पाटील य़ांच्यावर राज्यभरातून टीका करण्यात येत आहे. पाटील यांच्या विरोधात वकील असिम सरोदे यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.

दरम्यान, पाटील यांच्या या विधानावरुन शिवसेनेसह राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. शिवसेना खासदार प्रियंका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) म्हणाल्या, माध्यमांशी बोलताना भाजपकडून महिलांबाबत नेहमीच खालच्या पातळीवर टीका केली जाते. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने सध्या महागाईशी लढणाऱ्या देशभरातील सर्व महिलांचा अपमान झाला असून, सुप्रिया सुळेंसह देशभरातील महिलांची चंद्रकांत पाटलांनी माफी मागावी असं वक्तव्य केलं आहे.

Edited By- Santosh Kanmuse

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com