Budget 2022: आत्मनिर्भर भारतासाठी नवीन शैक्षणिक धोरण - राष्ट्रपती

सरकार कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. गरिबांना मोफत रेशन दिले जात आहे. भारतात अन्न वितरणाचा सर्वात मोठा कार्यक्रम राबवला जात आहे
Ramnath Kovind
Ramnath KovindSaam Tv

मुंबई : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. त्याची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणाने झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) संसद भवनात पोहोचल्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मंत्र्यांनी त्यांचे स्वागत केले. सेंट्रल हॉलमध्ये राष्ट्रपती (President) रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. अधिवेशन सुरू झाल्यानंतर उद्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2021-22 आर्थिक सर्वेक्षण सभागृहात सादर करतील. (Union Budget 2022 Live Updates)

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणाने झाली. ते म्हणाले की, सरकार कोरोनाचा (Corona) सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. गरिबांना मोफत रेशन दिले जात आहे. भारतात अन्न वितरणाचा सर्वात मोठा कार्यक्रम राबवला जात आहे अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

हे देखील पहा -

कोरोना काळात फार्मा कंपन्यांनी काम करुन दाखवलं आहे. सध्या, भारतीय फार्मा कंपन्यांची उत्पादने 180 हून अधिक देशांमध्ये पोहचत आहेत, परंतु या क्षेत्रात भारताची व्याप्ती खूप विस्तृत आहे. सरकारद्वारे जारी करण्यात आलेल्या पीएलआयचा वापर फार्मा कंपन्यांनी करावा असे आवाहन देखील रामनाथ कोविंद यांनी यावेळी केले.

पुढे रामनाथ कोविंद म्हणाले की,माझं सरकार बाबासाहेब आंबेडकर यांचे आदर्श मानतं. पद्म पुरस्कारांमध्ये भारताच्या शक्तीचं प्रदर्शन दिसून आलं. सरकारनं पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत धान्य पुरवठा केला. जभारतात अन्न वितरणाचा सर्वात मोठा कार्यक्रम राबवला जात आहे. ही योजना मार्च 2022 पर्यंत राबवली जाणार आहे. तसेच पंतप्रधान ग्रामीण आवास योजनेतून गेल्या वर्षांच्या प्रयत्नातून 2 कोटीहून अधिक गरीब लोकांना पक्की घरं मिळाली. जलजीवन मिशन योजनेनं लोकांंचं जीवन बदललं, 6 कोटी घरांना नळांच्या कनेक्शनने जोडले

Ramnath Kovind
PM Modi Press Meet: भारतावर जगाचा विश्वास- पंतप्रधान नरेंद्र मोदी

आत्मनिर्भर भारतासाठी नवीन शैक्षणिक धोरण

आत्मनिर्भर भारताचं स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी सरकार देशात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे स्थानिक भाषांनाही प्रोत्साहन दिले जाणार आहे. महत्त्वाच्या प्रवेश परीक्षा भारतीय भाषांमध्ये घेण्यावर भर दिला जाणार आहे. केंद्राच्या माध्यमातून सव्वा दोन कोटी विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाच्या योजनांचा लाभ घेता येणार आहे. आदिवासी तरुणांच्या शिक्षणासाठी, प्रत्येक आदिवासी भागात एकलव्य निवासी मॉडेल स्कूलचा विस्तार करण्याचे काम शासनाकडून केले जात आहे.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद म्हणाले की, कोरोनाच्या या आपत्तीमध्ये आपण मोठ्या देशांमध्ये अन्नाची कमतरता आणि उपासमारीची समस्या पाहिली आहे, परंतु माझ्या संवेदनशील सरकारने या सर्वात मोठ्या संकटात एकही गरीब उपाशी राहू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com