Rajya Sabha Election 2022: मुंबईत भाजपाचा विजयोत्सव; फडणवीसांचं जोरदार स्वागत

Rajya Sabha Election 2022: या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच ठरलेले देवेंद्र फडणवीस यांचं मुंबईच्या भाजप कार्यालयात जोरादार स्वागत केलं.
BJP Grand Celebration in Mumbai After Winning Maharashtra Rajya Sabha Election 2022
BJP Grand Celebration in Mumbai After Winning Maharashtra Rajya Sabha Election 2022Twitter/@BJP4Maharashtra

मुंबई: राज्यसभेच्या ६ जागांसाठीचं मतदान काल (शुक्रवारी) पार पडलं. भाजपने यात तिसरा उमेदवार दिल्याने राज्यसभेच्या (Rajya Sabha Election 2022) ६ जागांसाठी ७ उमेदवार रिंगणात होते त्यामुळे ही निवडणूक चुरशीची झाली. या निवडणुकीचा (Election 2022) निकाल शनिवारी मध्यरात्री लागला. यात भाजपने दिलेला तिसरा उमेदवार निवडून आला असून शिवसेनेला पराभवाचा सामना करावा लागला त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची खेळी यशस्वी ठरल्याचे मानले जाते. यानंतर भाजपने मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं आहे. या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच ठरलेले देवेंद्र फडणवीस यांचं मुंबईच्या भाजप कार्यालयात जोरादार स्वागत केलं. यावेळी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. (BJP Grand Celebration in Mumbai After Winning Maharashtra Rajya Sabha Election 2022 Fadnavis Gets Special Appraisal)

हे देखील पाहा -

महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिन्ही उमेदवारांना विजय मिळाला. काँग्रेसचे इम्रान प्रतापगढ़ी, शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे (NCP) प्रफुल्ल पटेल विजयी झाले आहेत. मात्र, शिवसेनेच्या (ShivSena) संजय पवारांचा निवडणुकीत पराभव झालाय.

राज्यसभेचे विजयी उमेदवार :

1. प्रफुल्ल पटेल- राष्ट्रवादी काँग्रेस- 43

2. इम्रान प्रतापगढी- काँग्रेस- 44

3. पियुष गोयल-भाजप- 48

4. अनिल बोंडे- भाजप- 48

5. संजय राऊत- शिवसेना- 42

6. धनंजय महाडिक- भाजप - 41

BJP Grand Celebration in Mumbai After Winning Maharashtra Rajya Sabha Election 2022
Rajya Sabha Election : आशिष शेलार-नितेश राणेंच्या रणनीतीमुळे शिवसेनेचे एक मत बाद

यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीसांनी जय भवानी जय शिवाजी- भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. फडणवीस म्हणाले ज्यांनी इतिहास रचला आणि संजय राऊतांपेक्षा जास्त मताने निवडून आले ते धनंजय महाडीक आहेत. हा विजय विजय लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळकांना समर्पित करतो, त्यांच्या मतदानामुळे तिसरी जागा निवडून आली असं फडणवीस म्हणाले. तसेच विजयामुळे अनेकांच्या तोंडचं पाणी पळालंय असा टोला फडणवीसांनी लगावला. तसेच आपण जिंकलोय उन्माद करायचा नसतो असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com