Sharad Pawar Speech: ज्येष्ठ नागरिक समाजाचा ठेवा; वय झालं म्हणून थकायचं नाही: शरद पवार

Baramati News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीतील जेष्ठ नागरिकांशी संवाद साधला. बारामतीतील जेष्ठ नागरिक संघात हा कार्यक्रम पार पडला.
sharad pawar
sharad pawarsaam tv

Sharad Pawar Speech:

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीतील जेष्ठ नागरिकांशी संवाद साधला. बारामतीतील जेष्ठ नागरिक संघात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना शरद पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केले. तसेच जेष्ठ नागरिक समाजाचा ठेवा आहे तो जपला पाहिजे, असे म्हणत त्यांच्या वयावरुन टीका करणाऱ्यांनाही पुन्हा एकदा सडेतोड उत्तर दिले.

काय म्हणाले शरद पवार?

"जेव्हा मी कृषी मंत्री पदाचा पदभार स्वीकारला तेव्हा आपण धान्य आयात करीत होतो, पण जेव्हा मंत्री पद सोडलं तेव्हा 11 देशांना आपण धान्य निर्यात करतो होतो. आपल्याकडे आधी जिनिंग होते. त्यानंतर माळेगाव, सोमेश्वर,छत्रपती कारखाना स्थापन झाला. तिथून पुढे कारखानदारी वाढीस लागली आणि इथली परिस्थिती बदलायला लागली," असे म्हणत शरद पवारांनी शेती बदलावर भाष्य केले.

पुण्यानंतर ज्ञानाचे केंद्र बारामती झालं. आपण इथे एमआयडीसी काढली, प्रक्रिया उद्योग करणारे उद्योग आपण काढले. एक काळ असा होता की समोर कुणी येत असेल त्याचे नाव माहिती असायचे. पण आता लोकं ओळखू येत नाही कारण अनेक लोक इथे बाहेरून आले स्थायिक झाले. त्यामुळे बारामतीचा नावलौकिक वाढला, असेही शरद पवार म्हणाले.

sharad pawar
LPG Cylinder Price : घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी कपात, महिलादिनी PM मोदींची मोठी घोषणा

"वय वाढले त्याचा परिणाम होतील, आपलं पाय दुखतील, इतर व्यधी होतील पण त्याचा (डोक्यावर) परिणाम होणार नाही. जेष्ठ नागरिक समाजाचा ठेवा आहे तो जपला पाहिजे. म्हणून वय झालं म्हणून थकायचं नाही. वय झालं म्हणून विचारांची प्रक्रिया सोडायची नाही. वय झालं म्हणून नवी पिढीला मार्गदर्शन करायचं सोडायच नाही," असेही शरद पवार म्हणाले. (Latest Marathi News)

sharad pawar
Rohit Pawar : कारखान्यावर राजकीय द्वेषातून ईडीची कारवाई; जप्तीच्या अ‍ॅक्शननंतर रोहित पवार यांचा हल्लाबोल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com