'राज्य़ातील भाजप नेत्यांची अवस्था म्हणजे 'जल बिन मछली'

"देवेंद्र फडणवीसांपासून ते चंद्रकांत पाटलांपर्यंत सर्वांच मानसिक संतुलन बिघडलं आहे"
'राज्य़ातील भाजप नेत्यांची अवस्था म्हणजे 'जल बिन मछली'
'राज्य़ातील भाजप नेत्यांची अवस्था म्हणजे 'जल बिन मछली'SaamTV

मुंबई : दोन वर्षापूर्वी जनतेने भाजपला BJP सत्तेवरुन खाली खेचल्यापासून भाजपच्या देवेंद्र फडणवीसांपासून ते चंद्रकांत पाटलांपर्यंत (Devendra Fadnavis, Chandrakant Patil) सर्वांचं मानसिक संतुलन बिघडलं असून भाजपच्या नेत्यांची अवस्था ही 'जल विना मछली' सारखी झाली असल्याची टीका महाराष्ट्र काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे Atul Londhe यांनी केली आहे.

हे देखील पहा -

तसेच भाजपच्या नेत्यांना आता देगलूर पोटनिवडणुकीचा पराभव समोर दिसत आहे त्यामुळे त्यांनी आपल्या सहयोगी संस्था म्हणजे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय (ED,CBI,IncomeTax) यांना मैदानात उतरवून हा पराभव टाळता येतो का यासाठी प्रयत्न करत आहेत.

देगलूर पोटनिवडणूक -

नांदेड Nanded जिल्ह्यातील देगलूर-बिलोली येथील विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. दरम्यान 30 ऑक्टोबरला ही निवडणूक होणार असून 3 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर (Congress MLA Raosaheb Antapurkar) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवरती ही पोटनिवडणूक होणार आहेत याच पार्श्वभूमीवर लोंढे यांनी भाजपवरती निशाना साधला आहे.

'राज्य़ातील भाजप नेत्यांची अवस्था म्हणजे 'जल बिन मछली'
आर्यन खानला वाचविण्यासाठी शिवसेना कोर्टात जाते याचा अर्थ काय? - प्रवीण दरेकर

परंतु मी खात्रीने सांगतो की देगलूरची जनता भाजपला त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही आणि या निवडणूकीच प्रतिबिंब येणाऱ्या काळात संपूर्ण निवडणुकांमध्ये झालेल्या आपल्याला पाहायला मिळेल असा विश्वास देखील यावेळी अतुल लोंढे यांनी व्यक्त केला आहे.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com