Ajit Pawar: शिंदे-फडणवीसांनी वाचाळवीरांना आवरावं, अजित पवारांचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना सल्ला

आपल्या सहकाऱ्यांचं चुकत असेल तर त्यांना समज देण्याची गरज आहे.
ajit pawar news
ajit pawar news saam tv

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) मध्यंतरी काही दिवसा प्रसारमाध्यमांपासून दूर होते. मात्र आता ते पूर्वीप्रमाणेच अॅक्टिव झाले आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्दांवर भाष्य केलं. शिंदे-फडणवीस सरकारमधील वाचाळवीर मंत्र्यांवरही त्यांनी निशाणा साधला. तसेच या वाचाळवीरांना आवरण्याचा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. (Latest Marathi News)

आपल्या सहकाऱ्यांचं चुकत असेल तर त्यांना समज देण्याची गरज आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री या दोघांचं देखील काम आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी देखील बोलणं गरजेचं आहे. सरकार आल्यापासून पोलीस विभाग प्रचंड तणावाखाली काम करत आहे. पोलिसांना वरिष्ठ पातळीवरून फोन येतात. आमच्यावर दबाव असल्याचं ते बोलून दाखवतात. हे वातावरण लोकशाहीला शोभणीय नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं.

ajit pawar news
Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाड यांना मोठा दिलासा, न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

अजित पवार पुढे म्हणाले की, तुमच्या पक्षात वाचाळवीरांची संख्या वाढतेय, हे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. यावेळी त्यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तारांवर निशाणा साधला. तुम्ही सामान्य नागरिक नाही, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या वक्तव्याबाबत, विनाशकारी विपरीत बुद्धी असच बोलायला हवं.

ajit pawar news
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या गुवाहाटी दौऱ्याचा मुहूर्त ठरला; ‘या’ तारखेला आमदारांना घेऊन जाणार

महाराष्ट्रात राहून प्रकल्प बाहेर जाण्यासाठी प्रयत्न करणे योग्य नाही

राज्यातील मोठे प्रकल्प परराज्यात जात आहेत, या मुद्द्यावर बोलताना अजित पवार यांनी म्हटलं की, राज्यातील काही वरिष्ठ आपल्या राज्यांतील प्रकल्प दुसऱ्या राज्यात नेण्यासाठी प्रयत्न करत आहे. मला वाटतंय महाराष्ट्रात राहून असे प्रयत्न करणे योग्य नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com