Thane : एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ आनंद आश्रमात कार्यकर्ते जमणार; लाखोंच्या संख्येने येण्याचं आवाहन

Political Crisis In Maharashtra : एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्या आता ४७ झालीय. यात शिवसेनेचे ३८ आणि इतर ९ आमदार आहेत. यात ८ जण कॅबिनेट आणि राज्यमंत्री आहेत.
Activists will gather at Anand Ashram in support of Eknath Shinde; Tension in Thane
Activists will gather at Anand Ashram in support of Eknath Shinde; Tension in ThaneSaam

मुंबई: ठाण्यातील शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या समर्थनासाठी ठाण्यातील शिवसैनिक दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या आनंद आश्रम या कार्यालयात जमणार आहेत. हे शक्ती प्रदर्शन नसले तरी पदाधिकारी याठिकाणी जमणार असल्याची माहिती सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. ठाणे (Thane) शहरातील ठेंभी नाका याठिकाणी दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांचं 'आनंद आश्रम' नावाचं कार्यालय आहे. याठिकाणी आज (सोमवारी) सकाळी १० वाजता कार्यकर्ते जमणार आहे. शिवसेनेचे ठाणे विभागप्रमुख बबन मोरे आणि माजी नगरसेवक प्रकाश शिंदे यांनी हे आवाहन केलं आहे. (Eknath Shinde Latest News)

हे देखील पाहा -

एकनाथ शिंदे गटातील आमदारांना उपमुख्यमंत्री पदासह अनेक कॅबिनेट मंत्रीपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे. बंडखोर आमदार भाजपसोबत जात सरकार स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहे. एकनाथ शिंदे गटातील मंत्री पदांची यादी साम टीव्हीला मिळाली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांची संख्या आता ४७ झालीय. यात शिवसेनेचे ३८ आणि इतर ९ आमदार आहेत. यात ८ जण कॅबिनेट आणि राज्यमंत्री आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेना आमदार -

1) एकनाथ शिंदे (मंत्री)

2) अनिल बाबर

3) शंभूराजे देसाई (मंत्री)

4) महेश शिंदे

5) शहाजी पाटील

6) महेंद्र थोरवे

7) भरतशेठ गोगावले

8) महेंद्र दळवी

9) प्रकाश अबिटकर

10) डॉ. बालाजी किणीकर

11) ज्ञानराज चौगुले

12) प्रा. रमेश बोरनारे

13) तानाजी सावंत

14) संदीपान भुमरे (मंत्री)

15) अब्दुल सत्तार नबी

16) प्रकाश सुर्वे

17) बालाजी कल्याणकर

18) संजय शिरसाठ

19) प्रदीप जयस्वाल

20) संजय रायमुलकर

21) संजय गायकवाड

22) विश्वनाथ भोईर

23) शांताराम मोरे

24) श्रीनिवास वनगा

25) किशोरअप्पा पाटील

26) सुहास कांदे

27) चिमणआबा पाटील

28) सौ. लता सोनावणे

29) प्रताप सरनाईक

30) सौ. यामिनी जाधव

31) योगेश कदम

32) गुलाबराव पाटील (मंत्री)

33) मंगेश कुडाळकर

34) सदा सरवणकर

35) दीपक केसरकर

36) दादा भुसे (मंत्री)

37) संजय राठोड

38) उदय सामंत (मंत्री)

एकनाथ शिंदे गटातील अपक्ष आमदार -

1) बच्चू कडू (मंत्री)

2) राजकुमार पटेल

3) राजेंद्र यड्रावकर (मंत्री)

4) चंद्रकांत पाटील

5) नरेंद्र भोंडेकर

6) किशोर जोरगेवार

7) सौ.मंजुळा गावित

8) विनोद अग्रवाल

9) सौ. गीता जैन

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com