राजगुरूनगर येथे कपड्याच्या दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान

राजगुरुनगर येथील संगम कपड्याच्या दुकानाला आज चार वाजल्याच्या सुमारास दुकानातील दुरुस्तीची कामे सुरु असताना आग लागल्याची घटना घडली आहे.
राजगुरूनगर येथे कपड्याच्या दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान
राजगुरूनगर येथे कपड्याच्या दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसानरोहिदास गाडगे

रोहिदास गाडगे

पुणे : राजगुरुनगर येथील संगम कपड्याच्या दुकानाला आज चार वाजल्याच्या सुमारास दुकानातील दुरुस्तीची कामे सुरु असताना आग लागल्याची घटना घडली आहे. आगीत कपड्याच्या दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे जिवितहानी मात्र टळली आहे. A huge fire broke out at a clothing shop at Rajgurunagar

उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक मोठे असलेले राजगुरुनगर शहरातील संगम कलेक्शन या कपड्याच्या दुकानाला आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली आहे लॉकडाऊनमध्ये कपड्याचे दुकान बंद असल्याने दुकानात दुरुस्तीची कामे सुरु होती यावेळी अचानक आग लागली आहे..

हे देखील पहा-

या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात दुकानाचे नुकसान झाले असून घटनास्थळी विशेष आर्थिक क्षेत्रातील (सेझ) मधील व राजगुरूनगर,आळंदी परिषदेच्या अग्निशामक दलाच्या वतीने आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र १ तासापासून लागलेल्या भीषण आगीवर अजूनही नियंत्रण आले नाही. घटनास्थळी खेड पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी वाहतूक रोखून आगीच्या बंब जाण्यायेण्यासाठी रस्ते मोकळे केले. राजगुरूनगर शहरातील मोठ्या संख्येने नागरिक मदत कार्य हाती घेतले आहे. आगीचे लोट अजूनही कायम सुरू असून आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरू आहेत.

राजगुरूनगर येथे कपड्याच्या दुकानाला भीषण आग; लाखोंचे नुकसान
अलिबागमध्ये पोलिसाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या !

जिल्ह्यात नावाजलेल्या दुकानाला आग लागल्याने शहरातील नागरिकांनी दुकानजवळ मोठी गर्दी जमा केली. गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली मात्र नागरिक ऐकत नव्हते. ऐकत नसल्याने पोलिसही त्यापुढे हतबल झाले. आगीने उग्र स्वरूप धारण केले असून पुण्यावरून पुण्याच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले आहे. दुकानात कपडे असल्याने आगीने आखे दुकान काबीज केले आहे.

संगम क्लॉथ सेंटर या कपड्याच्या दुकानाची दुरुस्ती सुरु असताना पुरातत्व विभागाने नोटिस दिली होती मात्र या नोटिस आणि कारवाईकडे दुर्लक्ष करत दुकान मालकाने काम सुरु ठेवले होते ..राजगुरुनगर नगरपरिषदेने संगम क्लॉथ सेंटर दुकानावर दोन वेळा अनाधिकृत बांधकामावरुन कारवाई करण्यात आली होती...त्यामुळे आता आगीच्या घटनेनंतर राजगुरुनगर नगरपरिषद काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com