'वाह रे मोदी तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल'

 yuva sena protest on petrol diesel price hike in hingoli
yuva sena protest on petrol diesel price hike in hingoli

हिंगाेली : वाह रे माेदी तेरा खेल, सस्ती दारु महंगा तेल अशा घाेषणांनी आज (रविवार) युवा सेनेने हिंगाेली शहर दणाणून साेडले. युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यभर युवा सेनेच्या कार्यकर्ते पेट्रोल-डिझेल यासह गॅस दरवाढीविरोधात तीव्र निदर्शने करत आंदोलन करीत आहेत. yuva sena protest petrol diesel price hike narendra modi shivsena hingoli news

 yuva sena protest on petrol diesel price hike in hingoli
वाहनातून फटाक्यांची वाहतुक करणार आहात? वसमतला काय घडले वाचा

हिंगोलीत शेकडो युवा सैनिक व शिवसैनिक या आंदोलना दरम्यान सायकल घेऊन सहभागी झाले होते. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत महागाई विरोधात एल्गार पुकारण्यात आला. येणाऱ्या काळात केंद्र सरकारने वाढती महागाई कमी न केल्यास केंद्र सरकारच्या मंत्र्यांना रस्त्यावरती फिरू न देण्याचा इशारा युवा सैनिकांनी दिला आहे

शिवसेनेच्या युवा सैनिकांच्या आंदोलनामुळे शहरात काही काळ वाहतूक रोखण्यात आली होती. कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.

edited by : siddharth latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com