दरवाढीचा असाही परिणाम! पेट्रोल परवडेना म्हणून घेतला चक्क घेतला घोडा (Video)

या व्यक्तीने पंधरा हजार पाचशे रुपयाचा घोडाच विकत घेतला आहे. त्या घोड्याने ते रोज १५ ते २० किलोमीटरचा प्रवास करतात.
दरवाढीचा असाही परिणाम! पेट्रोल परवडेना म्हणून घेतला चक्क घेतला घोडा (Video)
दरवाढीचा असाही परिणाम! पेट्रोल परवडेना म्हणून घेतला चक्क घेतला घोडा (Video)संजय राठोड

यवतमाळ - पेट्रोलच्या दरात सतत वाढ होत असल्याने वाहनचालकांना पेट्रोल परवडत नाही. अशात पेट्रोलच्या दरात सतत होणारी वाढ बघून वाहन चालकांना दररोज धक्का बसत आहे. मात्र, यवतमाळ जिल्ह्यातील तेंडोळी येथील दत्ता थावरा राठोड यांनी मात्र यावर एक तोडगा काढला आहे. पेट्रोलच्या किंमतीत होणाऱ्या वाढीला कंटाळून दत्ता थावरा राठोड याने चक्क एक घोडा विकत घेतला आहे.

या व्यक्तीने पंधरा हजार पाचशे रुपयाचा घोडाच विकत घेतला आहे. त्या घोड्याने ते रोज १५ ते २० किलोमीटरचा प्रवास करतात. आता पेट्रोलचे भाव कितीही वाढले तरी मला काही घेणे देणे नसल्याची प्रतिक्रिया दत्ता राठोड यांनी दिली आहे.दत्ता येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना देखील घोडा घ्या किंवा सायकलने प्रवास करा असे सांगतात.

दरवाढीचा असाही परिणाम! पेट्रोल परवडेना म्हणून घेतला चक्क घेतला घोडा (Video)
भद्रकाली पोलिसांनी 24 तासत घरफोडी करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या

दुचाकीला टायर, ऑईल चेंज आणि त्याला लागणारे पेट्रोल हे सर्व सामान्य नागरिकांना न परवडणारे झाले आहे. पेट्रोल 105 रुपये प्रती लिटर झाले आहे. त्यामुळे दत्ता यांनी घोडा घेतल्याने पेट्रोलच्या किंमती कितीही वाढल्या तरी काही फरक पडणार नाही असे दत्ता राठोड यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पेट्रोलची डोकेदुःखी दूर करायची असेल तर एकतर घोडा घ्या किंवा सायकलने प्रवास करा असे सल्ला देखील ते देतात.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com