पत्नीला अमानुष मारहाण करणाऱ्या पतीचा व्हिडिओ व्हायरल; पतीवर गुन्हा दाखल

अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
pune crime news unknown man dead body found in taljai forest pune
pune crime news unknown man dead body found in taljai forest puneSaam Tv

अकोला : अंगावर काटा आणणारा सध्या एक व्हिडिओ (Video) सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पती आपल्या पत्नीला अमानुष मारहाण करत असल्याच दिसून येत आहे. परंतु, या व्हिडिओमध्ये आईला नको ना बाबा,अशी चिमुकली विनवनी करीत असतानाही ऐकू येत आहे. अशा प्रकारचा व्हिडिओ अकोलामध्ये सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.

pune crime news unknown man dead body found in taljai forest pune
Breaking : पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंना सीबीआयकडून अटक

या व्हिडिओची सत्यता समोर आली आहे. अकोल्यातल्या कृषीनगर परिसरातील हा व्हिडिओ आहे. पत्नीला अमानुष मारहाण करणाऱ्या या नराधम पतीचं मनिष कांबळे असं नाव आहे. अन् तो आपल्या पत्नी संगिताला मारहाण करीत असून तिचं तोंड दाबत असल्याच दिसत आहे. गेल्या काही वर्षांपासून या पती-पत्नीत वाद आहे.

pune crime news unknown man dead body found in taljai forest pune
केंद्रीय यंत्रणांचा वापर हा लोकशाहीचा गळा घोटण्यासारखा - एकनाथ शिंदे

गेल्या तीन दिवसांपूर्वी दुपारी मनिषनं संगिताला अमानुषपणे मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. संगीताची मुलगी आईला मारू नका ना बाबा, अशा प्रकारची विनवणी करीत असतानाही तिचा ऐकू येत असून तिचा चेहरा दिसत नव्हता. दरम्यान, सुदैवानं संगीताची यातून सुटका झाली. आणि मनिष विरोधात शहरातील सिव्हील लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली. सिव्हिल लाइन पोलिसांनी (Police) 'मनीष कांबळे याला न्यायालयात हजर केले असता जिल्हा सत्र न्यायाल्याने त्याला जामीन दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com