'मुलगी झाली हो' लेकीच्या जन्माचं स्वागत, गावभर वाटली सव्वा क्विंटल जिलेबी!

हलगीच्या तालावर गावकऱ्यांनी ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला !
'मुलगी झाली हो' लेकीच्या जन्माचं स्वागत, गावभर वाटली सव्वा क्विंटल जिलेबी!
'मुलगी झाली हो' लेकीच्या जन्माचं स्वागत, गावभर वाटली सव्वा क्विंटल जिलेबी!SaamTvNews

बीड : एकीकडे मुलगी नको वंशाला दिवा हवा म्हणत मुलाच्या हव्यासापोटी अनेक विवाहितांचा छळ झालेल्या घटना, स्त्रीभ्रूण हत्येच्या बातम्या आपण पाहिल्यात. मात्र, बीडच्या (Beed) मोठेवाडीत मुलगी झाली म्हणून एका पठ्ठ्यांन गावभर जल्लोष करत तब्बल सव्वाक्विंटल जिलेबी वाटलीय. मोठेवाडी येथील सारिका अशोक रासवे यांना कन्यारत्न (Baby Girl) प्राप्त झाले.

हे देखील पहा :

तब्बल 36 वर्षांनंतर कुटुंबात पहिल्याच मुलीचे आगमन झाल्याने रासवे कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही. मुलीचे वडील अशोक रासवे यांनी तब्बल सव्वा क्विंटल जिलेबी गावभर वाटली. जिलेबी वाटताना ढोल ताशा आणि हलगीचा गजर करण्यात आला. दरम्यान या हलगीच्या तालावर गावकऱ्यांनी ठेका धरत आनंदोत्सव साजरा केला.

Edited By : Krushnarav Sathe

'मुलगी झाली हो' लेकीच्या जन्माचं स्वागत, गावभर वाटली सव्वा क्विंटल जिलेबी!
वकिलाच्या BMW गाडीला भीषण अपघात; चित्रपटातील दृश्यांप्रमाणे कारच्या कोलांट्या!
'मुलगी झाली हो' लेकीच्या जन्माचं स्वागत, गावभर वाटली सव्वा क्विंटल जिलेबी!
गोंदिया : लॉजमध्ये 'प्रॉमिस डे' दिवशीच प्रेमी युगुलाची आत्महत्या!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com