Bhagwat Karad Today News: युवकांना रोजगार व महानगरातील उद्योगांना कुशल मनुष्यबळ देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य - डॉ. भागवत कराड

युवकांना रोजगार देण्यासोबतच आपल्या महानगरातील उद्योगांना कुशल मनुष्यबळ देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य करणार आहे, असे प्रतिपादन अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांनी केले.
Bhagwat Karad Today News
Bhagwat Karad Today NewsSaam tv

Dr. Bhagwat karad News: केंदीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीत आज कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत झालेल्या ‘इंडस्ट्रियल मीट’च्या माध्यमातून 250 सामंजस्य करार करण्यात आले आहेत. युवकांना रोजगार देण्यासोबतच आपल्या महानगरातील उद्योगांना कुशल मनुष्यबळ देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य करणार आहे, असे प्रतिपादन अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड यांनी केले. (Latest Marathi News)

चिकलठाणा एमआयडीसी येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने आयोजित औरंगाबाद व नाशिक विभागाच्या वतीने ‘इंडस्ट्रियल मीट’कार्यक्रमात ते बोलत होते.

Bhagwat Karad Today News
Maharashtra Udyog Award: रतन टाटा यांना पहिला महाराष्ट्र उद्योग पुरस्कार, तर आदर पुनावाला यांना उद्योगमित्र पुरस्कार जाहीर

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. कराड म्हणाले, आपल्या महानगरात उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण आहे. उद्योगांना पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचे सहकार्य असेल. केंद्र व राज्य शासन रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी कटीबद्ध आहे. ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे'.

'या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून युवक, युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यासोबतच आवश्यक प्रशिक्षण, कौशल्य विकासाबाबत मार्गदर्शन, बॅंकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्धतता याबाबतही आपण सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे ते म्हणाले.

Bhagwat Karad Today News
BMC News: मुंबई महानगरपालिकेतील २४ विभागांत आठवडी बाजाराचे आयोजन होणार, मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती

आपल्या देशाची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी उद्योग क्षेत्रात काम वाढवावे लागणार आहे. 2047 ला आपला देश विकसीत राष्ट्र तसेच विश्वगुरू व्हावा, यासाठी प्रत्येक घटकाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचा उल्लेख डॉ. कराड यांनी केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com