"काका माझा भाचा तळमळून मेला हो"; खासदारांपुढे शेतकऱ्याचा आक्रोश

जिल्ह्यातील तासगाव येथे तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकित ऊस बिलासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली खासदार संजय पाटील यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला होता.
"काका माझा भाचा तळमालून मेला हो"; खासदारांपुढे शेतकऱ्याचा आक्रोश
"काका माझा भाचा तळमालून मेला हो"; खासदारांपुढे शेतकऱ्याचा आक्रोशविजय पाटील

विजय पाटील

सांगली : जिल्ह्यातील तासगाव येथे तासगाव आणि नागेवाडी कारखान्याच्या थकित ऊस बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (Swabhimani Shetkari Sanghtna) वतीने जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली खासदार संजय पाटील (Sanjay Patil) यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला होता. तो मोर्चा शिवाजी महाराजांना वंदन करून तो मोर्चा विटा नाका येथे आला. चिंचणी रोड येथे पोलीसानी तो मोर्चा रोखला पोलीसांची व स्वाभिमानीच्या कार्याकर्ताची धुमचक्री झाली परत तो मोर्चा विटा नाका येथे थांबला तेथे रस्ता रोको करण्यात आला. त्यावेळी खासदार संजय काका पाटील हे मोर्चा स्थळी आले आणि त्यांनी सांगितले की, येत्या दोन फेब्रुवारी पर्यंत ऊस बिले सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करतो.

"काका माझा भाचा तळमालून मेला हो"; खासदारांपुढे शेतकऱ्याचा आक्रोश
Australian Open 2022: अमांडा अ‍ॅनिसिमोव्हाने गतविजेत्या Naomi Osaka ला हरवलं

दरम्यान, मोर्चातच खासदार संजय पाटील यांच्यावर एक शेतकरी कार्यकर्ता गहिवरला आणि म्हणला,"संजय काका मी तुमचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. माझा भाचा तळमळुन मेला. हे बरोबर नाही. वेळेवर पैसे मिळाले नाहीत म्हणून दवाखान्यात भाचा मेला..." कारखान्याचे बिल ना मिळाल्याने शेतकऱ्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. गेल्या वर्षभरापासून वारंवार चेक आणि तारखा मिळाल्याने शेतकऱ्याने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. आता जोपर्यंत पैसे मिळणार नाहीत तो पर्यंत तासगाव तहसील कार्यालयासमोरून उठणार नाही अशी भूमिका शेतकरी यांनी व्यक्त केली आहे. (Sangli News)

हे देखील पहा-

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com