Ulhasnagar : भाडेकरूला काढण्यासाठी मालकानेच पाठवले गुंड; उल्हासनगरमधील प्रकार

भाडेकरूला बाहेर काढून आपली जागा रिकामी करून घेण्यासाठी मालकानेच गुंड पाठवल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे.
Crime News
Crime NewsSaam TV

Ulhasnagar Crime News : भाडेकरूला बाहेर काढून आपली जागा रिकामी करून घेण्यासाठी मालकानेच गुंड पाठवल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैदी झाली आहे. या प्रकरणी मालकाविरुद्ध विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

Crime News
Pune Crime: पार्टीत मित्राकडून घात; दारुच्या नशेत असलेल्या मैत्रिणीवर अत्याचार, आरोपी अटकेत

उल्हासनगरच्या (Ulhasnagar) कॅम्प ४ मधील ओटी सेक्शनमध्ये संजय गुप्ता यांचा कपड्यांचा कारखाना आहे. या कारखान्याची जागा मुकेश वाधवा यांची आहे. मात्र वाधवा आणि भाडेकरू गुप्ता यांच्यात सुरू असलेल्या वादामुळे हे प्रकरण कोर्टात गेलं. त्यामुळे गुप्ता हे मागील तीन महिन्यांपासून कोर्टात या जागेचं भाडं भरत आहेत. त्यामुळे ही जागा रिकामी करून घेण्यासाठी वाधवा यांच्याकडून गुप्ता यांना वारंवार धमक्या दिल्या जात असल्याची गुप्ता यांची तक्रार आहे.

अशातच मंगळवारी २९ नोव्हेंबर रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास गुप्ता यांच्या कारखान्यात ८ ते १० गुंड घुसले. त्यांनी कारखान्याची तीन कुलूपं तोडून आतमध्ये प्रवेश केला आणि ऑफिसमध्ये येऊन बसले. ऑफिसमध्ये त्यांनी कागदपत्रं चाळली. त्यानंतर कारखान्यात जाऊन कपडे अस्ताव्यस्त फेकले. हा सगळा प्रकार गुप्ता यांच्या कारखाना आणि ऑफिसमधील सीसीटीव्हीत कैद झाला.

Crime News
Mumbai Crime : धक्कादायक! बापानेच केला मुलीचा विनयभंग; चेंबूर येथील धक्कदायक घटना

याप्रकरणी संजय गुप्ता यांच्या तक्रारीवरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात घुसखोरी, धमकी देणे आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी यापैकी काही जणांना अटक सुद्धा केली आहे. या प्रकरणात जागामालक वाधवा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी फिर्यादी संजय गुप्ता यांनी केली आहे. तर पोलिसांनी तूर्तास या प्रकरणात प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com