सातारा crime news : फलटण शहरात भर दिवसा एका चारचाकी वाहनाची काच फोडून दोन लाख रुपये चाेरुन चोरट्यांनी धूम ठाेकली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार वेळोशी (ता. फलटण) येथील सैन्य दलात कार्यरत असलेले अक्षय माने आणि त्यांच्या पत्नी फलटण शहरात फ्लॅट खरेदीसाठी कर्ज प्रकरणाची मिळालेली दोन लाख रुपयांची रक्कम शिवकृपा पतसंस्थेतून घेऊन नाश्ता करण्यासाठी डेक्कन चौकात आले. two-lacs-stolen-from-vehicle-near-phaltan-satara-crime-news-sml80
त्यांनी उमाजी नाईक चौक दरम्यान जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला त्यांची चार चाकी वाहन लावले. नाश्ता करण्यासाठी ते हॉटेलमध्ये गेले असता दुपारी दीड वाजता वाहनाच्या डाव्या बाजूची मागील काच फोडून वाहनात ठेवलेले दोन लाख रुपये चाेरले.
ही चोरी करताना आणि काच फाेडल्याची घटना समोरच असणाऱ्या एका हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. फलटण शहर पोलिस चाेरट्यांचा शोध घेत आहेत.
edited by : siddharth latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.