बरं झालं महात्मा गांधींना मारलं, कारण....; तुषार गांधींचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

महात्मा गांधी यांच्याबद्दल त्यांचे पणतू तुषार गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळं खळबळ उडाली आहे.
Tushar Gandhi
Tushar Gandhisaam TV

सांगली : महात्मा गांधी यांच्याबद्दल त्यांचे पणतू तुषार गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळं खळबळ उडाली आहे. स्वातंत्र्य संग्रामात बेमानी करणाऱ्या आणि आता ज्यांच्यामुळे नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्यांच्या सोबतच गद्दारी करणाऱ्यांची राज्यात सत्ता आहे. बर झालं गांधींना मारलं, (Mahatma Gandhi Death) कारण आज गांधी असते, तर आजची परिस्थिती बघून गांधीजी रोज झुरून झुरून मेले असते, असं विधान तुषार गांधी यांनी केल्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. (Tushar Gandhi latest News Update)

Tushar Gandhi
राजकीय वर्तुळात खळबळ! भाजप आमदार आकाश फुंडकर यांच्यासह २८ कार्यकर्त्यांवर गुन्हा

स्वातंत्र्य संग्रामात बेमानी करणाऱ्या आणि आता ज्यांच्यामुळे नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्यांच्या सोबतच गद्दारी करणाऱ्यांची सध्या राज्यात सत्ता आहे. अशी खरमरीत टीका महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे. सांगली मध्ये क्रांती अग्रणी जी डी बापू लाड यांच्या जन्मशताब्दी महोत्सवानिमित्त स्वातंत्र्य लढ्यातील 'प्रति सरकारचे योगदान' या विषयावर व्याख्यान आणि मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात तुषार गांधी बोलत होते.

Tushar Gandhi
Asia Cup 2022 : टीम इंडियावर मोठं संकट, संघाला गरज असतानाच धडाकेबाज क्रिकेटपटू स्पर्धेबाहेर

मेळाव्यात बोलताना तुषार गांधी म्हणाले, बरं झालं गांधींना मारलं, कारण आज गांधी असते, तर आजची परिस्थिती बघून गांधीजी रोज झुरून झुरून मेले असते. सभोवताली अन्याय अत्याचार सुरू असताना आपण गप्प बसलो आहोत. लोकशाही जीवंत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. लोकशाही नालायक होत चालली आहे, असं म्हणत तुषार गांधी यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर खंत व्यक्त केली आहे.

Edited By - Naresh Shende

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com