धक्कादायक! खेळायला बाहेर जातो असं सांगितलं, अन् तीन चिमुकल्यांना मृत्यूनं गाठलं

धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
Three child died in water drowning
Three child died in water drowningsaam tv

धुळे : जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे तीन चिमुकल्यांवर काळाने घाला घातला आहे. बाहेर खेळण्यासाठी जातो असे सांगून डोहात पोहायला गेलेल्या (Three children died) तीन बालकांना मृत्यूनं गाठलं. डोहाच्या पाण्यात उड्या मारल्यानंतर तिघांना पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्यांचा (water drowning) पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ग्रामस्थांनी या तिघांना पाण्यातून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या दुर्देवी घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com