Nashik Crime: सॉरी मला माफ करा; चोरलेला ऐवज परत करत चोराचा माफीनामा

मला पैशांची गरज होती पण मी ते घेतले नाही, सॉरी मला माफ करा. दागिन्यांच्या बॅगमध्ये अशी चिठ्ठी ठेवून चोराने माफी मागितली आहे.
Nashik Crime
Nashik Crimeअभिजित सोनावणे

नाशिक - शहरात एक आश्चर्यकारक घटना घडली आहे. नाशिकच्या (Nashik) जेलरोड (Jail Road) परिसरात ही घटना घडली आहे. एका चोराने चक्क चोरलेला ऐवज परत करत माफी देखील मागितली आहे. या चोराने (Thief) घराच्या छतावर एक चिट्ठी आणि ऐवज ठेवले होते. त्यामुळे तक्रारदाराला चोराने एक सुखद धक्का दिला आहे. (Nashik Crime Latest News)

या चोराने पकडल्या जाण्याची भीतीने का होईना चोरीचे दागिने परत केल्याने पोलिसांचा ताण कमी झाला आहे. माफीनामा लिहिणारा चोर तक्रारदाराच्या गल्लीत राहणारा आहे अशी माहिती खुद्द चोरानेच दिली आहे.

हे देखील पहा -

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, आपल्या घरी चोरी झाल्याची माहिती शरद साळवे यांनी शनिवारी पोलिसांत दिली. नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पथकाने घटनास्थळी जात पंचनामा सुरू केला. चोरी कशी झाली याचा शोध घेत असताना पोलिसांना घराच्या छतावर एक बॅग आढळून आली. यात चोरी गेलेला ऐवज होता आणि एक चिठ्ठी होती.

Nashik Crime
बार्शी-आगळगाव रस्त्याची बकाल अवस्था; नागरिक हैराण

चोराने या चिट्ठीमध्ये लिहले होते की, मी तुमच्या गल्लीतीलचं राहणार माणूस आहे, मला माफ करा मी तुमची बॅग घेतली आणि पत्र्यावर टाकली. मला पैशांची गरज होती पण मी ते घेतले नाही, सॉरी मला माफ करा. दागिन्यांच्या बॅगमध्ये अशी चिठ्ठी ठेवून चोराने माफी मागितली आहे. पोलिसांनी साळवे यांच्या तक्रारीनुसार अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com