तब्बल एक एकर जमीन गेली चोरीला!

सात बारा उतारा
सात बारा उतारा

मिरजगाव : मौल्यवान वस्तू, महागडी वाहने आणि रोकड चोरीला जाण्याच्या घटना सातत्याने वाचनात येतात; मात्र नागापूर (ता. कर्जत) येथील जमीनच चोरीला गेल्याची घटना उघडकीस आल्याने, गावामध्ये चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी ः नागापूर येथील पाच हेक्टर क्षेत्र गावठाण विस्तार योजनेसाठी राखीव ठेवलेले आहे. गावाचा विस्तार करून स्थानिक नागरिकांच्या राहण्याची सोय व्हावी, यासाठी हे क्षेत्र ग्रामपंचायतीने निश्चित केले होते. जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावरदेखील पाच हेक्टर क्षेत्राचीच नोंद होती. मात्र, ग्रामपंचायत प्रतिनिधींनी कामानिमित्त या जागेचा सात-बारा उतारा काढला असता, या उताऱ्यावरून चक्क एक एकर क्षेत्र गायब झाल्याची बाब सदस्यांच्या लक्षात आली. The land in the village was stolen

सात बारा उतारा
लग्नकल्लोळ! सुहागरात्री बाहेरून कडी लावून पळालेल्या वधूला अटक

गावठाणचे एक एकर क्षेत्र उताऱ्यावरून रात्रीत कसे गायब झाले? गायब झालेले हे क्षेत्र कोणाच्या नावावर करण्यात आले? या सर्व प्रकाराचा करता-करविता कोण, या सर्व प्रश्नाची चर्चा गावात चांगलीच रंगली.
याबाबत तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी संबंधित अधिकाऱ्यावर अधिकाराचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून, या जमिनीचा सात-बारा लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी केली आहे. ‘जाऊ तिथं खाऊ’ चित्रपटातील पटकथेत ज्याप्रमाणे रात्रीत विहीर गायब झाली, त्याचप्रमाणे रात्रीतून जमीन गायब होण्याचा हा गजब कारभार प्रशासन यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करीत आहे. The land in the village was stolen

योग्य तपास करू
या घटनेत गांभीर्याने लक्ष घालून तपास केला जाईल. याबाबतच्या तपासाचे आदेश देण्यात आले असून, कोणावरही अन्याय होणार नाही. योग्य तपास करूनच सात-बारा उताऱ्यावर दुरुस्ती केली जाईल.
-नानासाहेब आगळे, तहसीलदार, कर्जत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com