Nashik Crime: जंगलात फाशी देण्याचा प्रयत्न करणारा फरार निघाला मुलीचा 'बाप'

बापच मुलीचा वैरी निघाल्याचं उघड झाले आहे. नराधम बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Nashik Crime
Nashik CrimeSaam TV

नाशिक: 10 वर्षीय मुलीला जंगलात फासावर लटकवण्याचा नाशिकच्या (Nashik) दिंडोरी येथील जंगलात झाला होता. जंगलात जनावरं चरण्यासाठी घेऊन गेलेल्या गुराख्यामुळे मुलीचे वाचले प्राण वाचले होते. आता त्या घटनेचा खुलासा करण्यात पोलिसांना (Police) यश आले आहे. दिंडोरी जंगलातील मुलीला फाशी देण्याचा प्रयत्न झाल्याच्या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतलं आहे. मुलीच्या वडिलांनीचं 10 वर्षीय मुलीला जंगलात नेऊन फाशी देण्याचा प्रयत्न केल्याचं उघड झाले आहे. मुलगी नकोशी झाल्यानं जंगलात नेऊन मुलीला संपवण्याचा नराधम बापाचा प्रयत्न होता. बापच मुलीचा वैरी निघाल्याचं उघड झाले आहे. नराधम बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मुलीला संपवण्याच्या इराद्याने बापाने काल दुपारी मुलीला जंगलात नेऊन फाशी देण्याचा प्रयत्न केला होता. दिंडोरी तालुक्यातील देहरेवाडीच्या जंगलातील हा धक्कादायक प्रकार घडला होता. गुरख्याने मुलीला फाशी देण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला हटकल्यानं संबंधित मुलीचे प्राण वाचले होते तिथून फाशी देणारी व्यक्ती फरार झाली होती. मुलीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलीची ओळख पटवण्याचा काम पोलीस करत आहेत. दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन घटनेचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com