जगभरामध्ये हवामान बदलाचे परिणाम; 2030 पर्यंत 9 कोटी लोकांवर उपासमारीचं संकट?

या हवामान बदलातील धोक्याच्या घंटेमुळे चिंता अधिक वाढली आहे.
Aurangabad News
Aurangabad NewsSaam Tv

औरंगाबाद - जगभरामध्ये हवामान बदलाचे परिणाम येत्या काळात अधिक भीषण जाणवणार आहेत. त्यात 2030 पर्यंत आपल्या देशातल्या 9 कोटी लोकांवर उपासमारीचं संकट कोसळण्याची भीती व्यक्त केली जातेय. या हवामान बदलातील धोक्याच्या घंटेमुळे चिंता अधिक वाढली आहे.

2030 पर्यंत आपल्या देशातील 9 कोटी लोकांना उपासमारीचा सामना करावा लागणार असल्याचा इशारा आंतरराष्ट्रीय अन्न धोरण संशोधन संस्थेनं दिलाय. हवामान बदलाच्या परिणामामुळे उष्णतेच्या लाटांचं प्रमाण किती तरी पटीने वाढून अन्नधान उत्पादन कमालीचे घटणार आहे. इतकंच नाही तर 2030 पर्यंत प्रत्येक माणसाचं कॅलरी ग्रहण करण्याचं प्रमाणही कमी होईल.

हे देखील पाहा -

सामान्य परिस्थितीत एक व्यक्ती दिवसाकाठी 2 हजार 697 कॅलरी ग्रहण करतो. मात्र, भविष्यातील वातावरणातील बदलांच्या परिणामांमुळे हाच आकडा 2 हजार 651 वर येईल. हवामान बदल आणि उष्णता वाढीमुळे धान्य, फळं, भाज्या, तेलबिया, डाळी, मांस यांच्या उत्पादनावर परिणाम होऊन उत्पादनात मोठी कमी होईल, असा अंदाज आहे.

हवामान बदलाचे परिणाम आताच दिसून येत असल्याने येत्या काळात उष्णतेच्या लाटांचं प्रमाण तिप्पट ते चौपट होईल, हे निश्चित आहे. तापमान वाढीचा परिणामामुळे 2041 ते 2060 च्या याकाळात अन्नधान्याचे उत्पादन 1.8 ते 6.6 टक्क्यांनी घसरेल. त्यानंतरच्या पुढच्या 40 वर्षात अन्न धान्य उत्पादनात 7.2 ते 23.6 टक्के इतकी मोठी घट होईल. हरित वायूंचं उत्सर्जन कमी करण्यासाठी आता सर्वच स्तरातून उपाययोजनाही सुरू झाल्यात.

Aurangabad News
धक्कादायक! बायकोला स्वयंपाक, साडी नेसता येत नाही म्हणून तरुणानं संपवलं जीवन

भविष्यातील मोठा धोका लक्षात घेऊन हळूहळू अन्नधान्याच्या उत्पादनात वाढ कशी होईल यासाठी पाऊल टाकले जात आहे. मात्र, हा धोका टाळण्यासाठी प्रत्येकांला जबाबदारीनं राहावं लागणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com