हत्या करुन पसार झालेल्या दोघा आरोपींना अवघ्या 10 तासात अटक

तिर्री येथील क्षुल्लक कारणासांठी चाकुने वार करत मित्रानी केली मित्राची हत्या प्रकरण
Bhandara Murder
Bhandara Murder अभिजीत घोरमारे

भंडारा: क्षुल्लक कारणासांठी चाकुने वार करत दोन मित्रांनी आपल्या मित्राची हत्या केल्याची घटना भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या अड्याळ पोलिस (Police) स्टेशन अंतर्गत तिर्री येथे घडली आहे. या प्रकरणी २ आरोपीला (accused ) स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल १० तासात अटक (arrested) केली आहे. कुशल भरने (वय-२७) व निखिल मेश्राम (वय-२१) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. राकेश कोवे (वय- २६) राहनार अंसारी वार्ड भंडारा असे मृतकाचे नाव आहे.

हे देखील पाहा-

काल सकाळी काही लोक माड़गी तिर्री मार्गावरून जात असतांना त्यांना मृतकाचे मृतदेह रस्त्याचा कड़ेला आढळले. काही क्षणातच याची माहिती अड्याळ पोलिसाना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचत मृतदेह ताब्यात घेत तपास सुरु केला . आपसी वादातुन मित्रानेच चाकूने वार करून, राकेश कोवेची हत्या करण्यात आली असल्याच्या अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Bhandara Murder
बापरे! हवा भरताना जेसीबीचा टायर फुटला; दोघांचा मृत्यू

पुराव्याचा आधारे या प्रकरणी 2 आरोपी ला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करण्यात आली आहे. दरम्यान रात्री ढाब्यावर जेवन करून जंगलात फिरायला गेल्यावर क्षुल्लक कारणाने चाकूने वार करत हत्या केल्याचे आरोपींने कबूल केले असून आरोपींवर कलम 302 अन्वये गुन्हा नोंद करत अटक करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com