खड्डा चुकविण्याच्या नादात २ ट्रकची समोरासमोर धडक; चौघांचा जागीच मृत्यू

महामार्गावरील खड्डा चुकविण्याच्या नादात हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Amravati Truck Accident
Amravati Truck AccidentSaam TV

अमर घटारे -

अमरावती : नागपूर-औरंगाबाद महामार्गावर (Nagpur-Aurangabad Highway) दोन ट्रकांची समोरासमोर धडक झाल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. ही धडक एवढ्या जोरात झाली आहे की दोन्ही ट्रकमधील (Truck) चार जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे.

महामार्गावरील खड्डा चुकविण्याच्या नादात हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातामूळे महामार्गावरील (Highway) वाहतूक जास्त वेळ खोळंबली होती. त्यामुळे जवळपास ८ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

पाहा व्हिडीओ -

मिळालेल्या माहितीनुसार नागपूर-औरंगाबाद महामार्गावरुन सळई घेऊन जाणारा एक ट्रक महामार्गावरील खड्डा चुकविण्याच्या नादात दुसऱ्या ट्रकवर आदळला या अपघातात दोन्ही ट्रकमधील चार जणांना जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघांच्या शरीरातून आरपार सळई घुसल्या आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com